भाजपच्या मिशन बारामतीचं पहिलं यश! सुप्रिया सुळेंना इंदापूरमधे झटका

मुंबई तक

• 03:10 PM • 29 Sep 2022

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती भाजपच्या मिशन बारामतीत सुप्रिया सुळेंना पहिला झटका देण्यात भाजपला यश मिळालं आहे. भाजपने इंदापूरमधला एक महत्त्वाचा नेता फोडला आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर हे पहिलं यश मानलं जातं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना पहिला झटका देण्यात भाजपने बाजी मारली आहे. बारामतीतला आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या एका महिला नेत्याने […]

Mumbaitak
follow google news

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती

हे वाचलं का?

भाजपच्या मिशन बारामतीत सुप्रिया सुळेंना पहिला झटका देण्यात भाजपला यश मिळालं आहे. भाजपने इंदापूरमधला एक महत्त्वाचा नेता फोडला आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर हे पहिलं यश मानलं जातं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना पहिला झटका देण्यात भाजपने बाजी मारली आहे. बारामतीतला आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या एका महिला नेत्याने हातात कमळ घेतलं आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आहे.

डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अर्चना पाटील यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

निर्मला सीतारामन जेजुरीच्या खंडोबा चरणी लीन, मिशन बारामती यशस्वी होण्यासाठी मागितला आशीर्वाद?

भाजपमध्ये प्रवेश करताच अर्चना पाटील यांनी काय म्हटलं आहे?

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. ओबीसींना भाजपने न्याय दिला आहे. महाविकास आघाडीने ओबीसींचं आरक्षण घालवलं पण भाजपची सत्ता येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं असं अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.

‘मिशन बारामती’ दगडावर डोकं आपटण्यासारखं; उगाचं वेळ वाया घालवू नका : भुजबळांचा भाजपला सल्ला

कोण आहेत अर्चना पाटील?

डॉ. अर्चना पाटील या इंदापूरच्या तालुक्यातील लासूर्णे गावातल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील लासूर्णेचं घराणं हे बडं प्रस्थ मानलं जातं. डॉ. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकाराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. अर्चना पाटील भाजपमध्ये आल्याने हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळणार आहे तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. अर्चना पाटील यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव म्हणून काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अर्चना पाटील यांनी धनगर समाजाचा मेळावा घेतला होता. धनगर समाजातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून अर्चना पाटील यांची ओळख आहे.

अर्चना पाटील यांनी बारातमी या लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर या विधानसभा मतदारसंघांमधल्या अनेक गावांमध्ये दौरेही केले आहेत.

मिशन बारामती नेमकं काय आहे?

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिशन बारामती आखलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवर पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडून गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. हेच भाजपचं मिशन बारामती आहे.

    follow whatsapp