नागपूर: देशभरामध्ये कोरोनाचं (Corona) तांडव पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे संपूर्ण जग हे भीतीच्या दहशतीखाली वावरत आहे आणि याचाच फायदा उचलणारे अनेक जण या निमित्तानं समोर येत आहेत. नागपूरमध्ये (Nagpur) तर चक्क आईस्क्रीम आणि फळ विकणारा (ice cream vendor) बोगस डॉक्टर (Bogus Doctor) लोकांवर उपचार करत असल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नागपूरच्या कामठीमध्ये या बोगस डॉक्टरने एक धर्मार्थ दवाखाना सुरू केला. खरं तर हा बोगस डॉक्टर मागील पाच वर्षापासून तो हा दवाखाना चालवत होता. या बोगस डॉक्टरचं नाव चंदन चौधरी असं असून त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा तोतया डॉक्टर कोरोना रुग्णांवर देखील उपचार करत असल्याचे समोर आलं आहे.
Pune Bogus Doctor: कम्पाउंडरने ‘असं’ सुरु केलं होतं स्वत:चं हॉस्पिटल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बोगस डॉक्टर चंदन चौधरी हा गेल्या अनेक वर्षांपासून फळ विकण्याचं काम करत होता. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेरिंगचं देखील काम केलं. त्यानंतर त्याने आईस्क्रीम विक्रीचा देखील व्यवसाय केला. या सगळ्यानंतर त्याने चक्क स्वत:चं रुग्णालय सुरु केलं. गेल्या पाच वर्षापासून ओम नारायण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित धर्मार्थ दवाखाना त्याने सुरू केला आहे.
या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक नॅचरोपॅथी पद्धतीने उपचार केला जात असल्याचा दावा करण्यात येत होता. पण कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता या डॉक्टरने कोरोनाचा उपचार करण्यास देखील सुरुवात केली. नवीन कामठी हद्दीत सैलाब नगरजवळ हा धर्मार्थ नावाचा बोगस दवाखाना उघडून रुग्णांवर औषध उपचार करुन लोकांची फसवणूक करीत असल्याची माहीती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा कामठी पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार करुन कारवाईला सुरुवात केली.
डॉक्टरच करत होता रेमडेसिवीरचा काळा बाजार, सापळा रचून पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
सुरुवातीला या पथकाने बिट मार्शल यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे तपास केली असता त्यांना चंदन नरेश चौधरी (वय 45 वर्ष) हा योग आयुर्वेद पंचकर्म नॕचरोपॕथी द्वारे बोगस उपचार करत असल्याचं आढळून आलं होतं. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या दवाखान्यात तपासणी केली तेव्हा त्यांना तिथे अॅलोपॅथीच्या अनेक प्रकारची औषधं आढळून आली. याशिवाय गर्भपातच्या गोळ्या आणि स्टेरॉईड, सलाईन, सिरिंज, आॕक्सिजन सिलेंडर, रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड तसेच इतर साहित्य देखील आढळून आली.
तब्बल 4 ऑक्सिजन टँकरची चोरी, पोलिसांनी फिल्मी स्टाइलने केली चोरट्यांना अटक
दरम्यान, डॉ. शबनम खानुनी यांनी जेव्हा सर्व रुग्णालयाची कागदपत्रे तपासली तेव्हा बोगस डॉक्टर चंदन चौधरी यांना सदर प्रकारे वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच चंदन चौधरी याने कोणतंही वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डॉक्टर असल्याचे भासवून दवाखाना सुरु केला. याद्वारे तो एक प्रकारे रुग्णांच्या जीवशीच खेळत होता.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बोगस डॉक्टरला ताब्यात घेतलं. आता त्याच्यावर महाराष्ट्र मेडीकल प्रॕक्टीश्नर अॕक्ट व इतर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. (the ice cream vendor was treating the corona patient a bogus doctors arrested)
ADVERTISEMENT