सुप्रसिद्ध बिसलेरी कंपनी टाटा ग्रुपने घेतली विकत, आता मिळणार TATA मिनिरल वॉटर?

मुंबई तक

• 11:57 AM • 24 Nov 2022

सुप्रसिद्ध अशी बिसलेरी कंपनी टाटा ग्रुपने विकत घेतली आहे. रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांच्या अध्यक्षतेखाली हा ब्रँड भारतात चांगलाच फोफावला. त्यानंतर टाटांनी तब्बल ७ हजार कोटींना हा ब्रँड विकत घेतला. पुढील दोन वर्षे बिसलेरीचं मॅनेजमेंट विद्यमान कंपनीकडेच राहील त्यानंतर टाटा कन्झ्युमर हे व्यवस्थापन ताब्यात घेईल. याआधी सुमारे ३० वर्षांपूर्वी रमेश चौहान यांनी थम्प्स अप (Thumps […]

Mumbaitak
follow google news

सुप्रसिद्ध अशी बिसलेरी कंपनी टाटा ग्रुपने विकत घेतली आहे. रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांच्या अध्यक्षतेखाली हा ब्रँड भारतात चांगलाच फोफावला. त्यानंतर टाटांनी तब्बल ७ हजार कोटींना हा ब्रँड विकत घेतला. पुढील दोन वर्षे बिसलेरीचं मॅनेजमेंट विद्यमान कंपनीकडेच राहील त्यानंतर टाटा कन्झ्युमर हे व्यवस्थापन ताब्यात घेईल. याआधी सुमारे ३० वर्षांपूर्वी रमेश चौहान यांनी थम्प्स अप (Thumps up), गोल्ड स्पॉट (Gold spot), लिमका (Limca) हे कोल्ड ड्रिंक्सचे ब्रँड (cold drinks Brands)कोकाकोला (coca cola) या अमेरिकन कंपनीला विकले होते.

हे वाचलं का?

मुकेश अंबानी यांना ‘टाटा’चा धक्का

बिसलेरी विकत घेण्यासाठी रिलायन्स रिटेल नेसले या कंपन्याही शर्यतीत होत्या पण टाटांनी बाजी मारली. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड म्हणून ओळखली जाणारी बिसलेरीची सुरुवात फार्मास्युटिकल कंपनी म्हणून झाली होती. या कंपनीचे संस्थापक इटालियन व्यापारी फेलिस बिसलेरी आधी मलेरियाची औषधं विकायचे. फेलिस बिसलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिसलेरीला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. भारतात डॉ. रॉसी यांनी वकील खुशरू संतकू यांच्या सहकार्याने बिसलेरी सुरू केली.

१९६९ मध्ये, बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी अवघ्या चार लाख रुपयांना विकत घेतली. तेव्हापासून या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांची मुलगी जयंतीला (Jayanti) या व्यवसायात रस नाही. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. आता ही कंपनी टाटांनी विकत घेतली आहे.

    follow whatsapp