CM शिंदेंविरोधात ठाकरे अविश्वास प्रस्ताव आणणार; सरकार कोसळणार?

ऋत्विक भालेकर

27 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:00 AM)

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

Mumbaitak
follow google news

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray :

हे वाचलं का?

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या दालनात खलबत झाली. (The Uddhav Thackeray Group is preparing to move a no-confidence motion in the Legislative Council against Chief Minister Shinde.)

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते. याच आरोपांवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी ठाकरे गटातील आमदारांमध्ये बैठकीत चर्चा झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले. विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबाळ जास्त असल्याने आता ठाकरेंच्या या खेळीने शिंदे अडचणीत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Budget Session : पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस-भास्कर जाधव भिडले, काय घडलं नेमकं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका करताना आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असं म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, जे त्यांचे मंत्री तुरुंगात गेले, हसिना पारकर, दाऊदची बहिण. तिला चेक दिला ज्यांनी देशद्रोह केला, त्यांचा राजीनामा घेण्याचीही धमक नव्हती, बरं झालं, त्यांचे साथीदार अजित पवार आहेत आणि त्यांच्यासोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं, असं शिंदे म्हणाले होते.

Shivsena : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हिप; आदेश डावलल्यास आमदारकी जाणार?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या याच आरोपांवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून आता शिंदे सरकारवर विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात खलबत झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले.

    follow whatsapp