इन्स्टाग्रामवर रिल्स बनवताना आपले फॉलोअर्स आणि लाईक्स वाढवण्याच्या प्रयत्नात शिवराळ भाषा आणि धमकी देणाऱ्या थेरगाव क्विन या युजरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात थेरगाव क्विन उर्फ साक्षी श्रीश्रीमालचा साथीदार कुणाल कांबळेही पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमधल्या वाकड पोलिसांनी सर्वात आधी साक्षी श्रीश्रीमाल आणि तिची साथीदार साक्षी कश्यपला अटक केली होती. परंतू या दोघींसोबत व्हिडीओत साथीदार असलेला कुणाल कांबळे हा फरार होता. बुधवारी मध्यरात्री सामाजिक सुरक्षा पथकाने कुणाल कांबळेला पुण्यातून अटक केली.
पोलीसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर कुणालने हात जोडून माफी मागितली आहे. माझ्या व्हिडीओमुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो मला क्षमा करावा असं कुणाल कांबळेने म्हटलं आहे. थेरगाव क्विन या अकाऊंटबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर जर स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणी शिवराळ, अश्लील भाषा आणि धमकी देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागेल हे पोलिसांनी या कारवाईतून दाखवून दिलं आहे.
ADVERTISEMENT