अहमदनगर जिल्ह्यातील घारहाव येथे एक विचीत्र प्रकार घडला आहे. शिंदोडी शिवारात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका टोळीतील चोराचा गळफास लागून जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्याच्यासोबत असणारे त्याचे साथीदारही काहीच करु शकले नाहीत. रुग्णालयात दाखल करण्याआधीच या चोराचा मृत्यू झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. योगेश विघे असं मृत चोराचं नाव आहे. याव्यतिरीक्त पोलिसांनी या टोळीतील विशाल पंडीत, आदित्य सोनावणे, संकेत दातीर, सरफराज शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
फोटोशूटसाठी तलावाच्या भरावावर गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू, पुण्यातल्या दौंडमधली घटना
नेमकं घडलं तरी काय?
मृत योगेशसह सर्व आरोपी शिंदोडी शिवारात टेम्पो आणि इनोव्हा कार चोरीच्या उद्देशाने शिरले होते. रविवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास आरोपींनी या चोरीसाठी पुर्वतयारी म्हणून योगेशला विजेच्या टॉवरवर चढवलं. गावात अंधार व्हावा यासाठी टॉवरवरील विजेच्या तारा कापत असताना आरोपी योगेशच्या कमरेला बांधलेली दोरी सुटली. याचवेळी तारा कापत असणाऱ्या योगेशचा तोल गेला आणि कमरेला बांधलेली दोरी गळ्यात अडकून त्याचा फास तयार झाला. काही क्षणांमध्येच योगेशची हालचाल बंद झाली आणि त्याने आपले प्राण गमावले अशी माहिती पोलिसांनी दिली.
ट्रेनच्या एसी डब्यातून गांजाची तस्करी, मुद्देमालासह आरोपी अटकेत
हा प्रकार घडल्यानंतर इतर आरोपींनी योगेशला खाली उतरवून तातणीने लोणी येथील रुग्णालयात दाखल केलं. परंतू ज्या वाहनातून हे आरोपी रुग्णालयात दाखल झाले होते त्यावरुन पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. यावेळी वाहनाची तपासणी करुन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT