लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीची परवानगी मिळावी – पंढरपूर नगराध्यक्षांची मागणी

मुंबई तक

• 02:56 AM • 15 Jun 2021

आषाढी एकादशीच्या वारीसाठी राज्य सरकारने नियम जाहीर केले आहेत. ज्यात पायी वारीला यंदाही परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांसोबत ठराविक वारकरी बसने पंढरपूरला प्रवास करणार आहेत. परंतू पंढरपुरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नगराध्यक्षा साधना भोसले यांनी ज्या वारकऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशांनाच वारीची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. राज्य शासनाने […]

Mumbaitak
follow google news

आषाढी एकादशीच्या वारीसाठी राज्य सरकारने नियम जाहीर केले आहेत. ज्यात पायी वारीला यंदाही परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांसोबत ठराविक वारकरी बसने पंढरपूरला प्रवास करणार आहेत. परंतू पंढरपुरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नगराध्यक्षा साधना भोसले यांनी ज्या वारकऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशांनाच वारीची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

राज्य शासनाने नियमावली जाहीर केल्यानंतरही काही वारकरी संघटना पायी वारीचा आग्रह धरत आहेत. कोरोनाची दुसरी लाट सध्या आटोक्यात आलेली असली तरीही भविष्यात तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी नगराध्यक्षांनी शासनाकडे लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचसोबत वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांनी स्थानिक लोकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असं आवाहन साधना भोसले यांनी केलं आहे.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या वारीवर कोरोनाचं सावट आहे. वाखरी गावाजवळ पोहचल्यानंतर पंढरपूरपर्यंतचा एक ते दीड किलोमीटरचा पट्टा पायी जाण्यास सरकारने वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. परंतू वाखरी ग्रामपंचायतीनेही या पायी वारीला विरोध केला आहे. याचसोबत वारीसाठी येणारे वारकरी हे किमान ६ दिवस पंढरपुरात असतात त्यामुळे या माध्यमातून शहरात पुन्हा कोरोना वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्यामुळे ही मागणी स्थानिक नेत्यांकडून होताना दिसत आहे.

आषाढी वारी 2021: पायी वारीसाठी वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

  • पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल

  • इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक

  • काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही

  • रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी

  • प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील

असा असेल दहा मानाच्या पालख्यांना क्रम –

१) संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)

२) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

३) संत सोपान काका महाराज (सासवड)

४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

५) संत तुकाराम महाराज (देहू)

६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७) संत एकनाथ महाराज (पैठण)

८) रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)

९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

१०) संत चांगटेश्वर (सासवड)

    follow whatsapp