शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरुद्ध गुन्हा; २३ वर्षीय तरुणीचा आरोप काय?

दिव्येश सिंह

• 03:09 AM • 03 Aug 2022

ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांच्याविरुद्ध एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने फिर्याद दिली असून, यात केदार दिघेंविरुद्ध धमकी दिल्याचा, तर त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार केल्याचा आरोप आहे. केदार दिघे यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांच्याविरुद्ध एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने फिर्याद दिली असून, यात केदार दिघेंविरुद्ध धमकी दिल्याचा, तर त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार केल्याचा आरोप आहे. केदार दिघे यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत.

हे वाचलं का?

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका २३ वर्षीय तरुणीनं केदार दिघे यांचे मित्र रोहित कपूरवर बलात्काराचा आरोप केला आहे. केदार दिघे आता याबाबत काय वक्तव्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केदार दिघे यांची नियुक्ती शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून झाल्यावर हे प्रकरण समोर आलं आहे.

तरुणीने तक्रारीत काय म्हटलंय? केदार दिघेंवर नेमका काय आरोप?

तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी हॉटेलमध्ये क्लब अॅम्बेसीडर म्हणून काम करते. मी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये सहा रेस्तराँ आहेत. हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींना हॉटेलच्या मेंबरशिप देण्याचं काम आहे. हॉटेलमध्येच माझी ओळख २७ जुलै २०२२ रोजी रात्री ९.४५ वाजता माझी ओळख रोहित कपूरसोबत झाली.

रोहित कपूरला मी हॉटेल मेंबरशिपबद्दल माहिती दिली. त्यांनी अगोदरपासून मेंबर असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. मी त्यांना व्हॉट्स अपवर मेंबरशिप घेण्याबद्दल माहिती पाठवली. २८ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता रोहित कपूरने हॉटेलची मेंबरशिप स्वीकारण्याबद्दल मेसेज केला.

आमच्या संवाद झाल्यानंतर रोहित कपूर यांनी मला हॉटेलच्या रुममध्ये डिनर करण्यासाठी येण्याबद्दल विचारलं. मी त्यांना नकार दिला. त्यानंतर मेंबरशिपबद्दल चर्चा करण्यासाठी रोहित कपूरने मला रुममध्ये बोलावलं. पण त्याही वेळी रोहित कपूरला नकार दिला, पण हॉटेल मॅनेजरची परवानगी घेऊन डिनरसाठी येईल, असं सांगितलं.

रोहित कपूरसोबत मी बाय द मिकाँग रेस्तराँमध्ये रात्री ११.३० वाजता डिनर करायला गेले. तिथे मेंबरशिपबद्दल चर्चा झाली. त्यानंतर ते मेंबरशिप घेण्यासाठी तयार झाले. मेंबरशिपचे पैसे घेण्यासाठी त्यांनी मला सोबत येण्यास सांगितलं. मी त्यांच्यासोबत गेले.

त्यांच्या रुममध्ये गेल्यानंतर त्यांनी आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर रोहित कपूरने माझ्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे मी हादरले आणि घरी गेले. नोकरीची गरज असल्यानं मी कुणालीही बोलले नाही.

केदार दिघेंनी दिली जिवे मारण्याची धमकी, तरुणीचा आरोप

तरुणीने पुढे तक्रारीत म्हटलं आहे की, या घटनेबद्दल मी माझ्या मित्राला सांगितलं. त्याबरोबर मी रोहित कपूर यांना मेसेज करून चुकीचं कृत्य केल्याचं सांगितलं. माझ्या मित्राने रोहित कपूरशी संपर्क केला. त्यानंतर मला त्यांना खाली बोलावून आणण्यासाठी पाठवलं. मी त्यांना खाली येण्याची विनंती केली. रोहित कपूर माझ्यावर रागावले आणि पैसे दिले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. मी नकार दिल्यानंतर केदार दिघे यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

    follow whatsapp