नागपूरमध्ये असलेल्या एका रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारही प्राण्यांनी चिकन खाल्ल्यानं तिघांचाही मृत्यू बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा) मुळे झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी सांगितलं की, कोंबडी खाल्ल्यामुळेच चारही प्राण्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. तसं, प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल अजून प्राप्त झालेले नसल्यानं हे मृत्यू खरंच चिकन खाल्यामुळे झालेत का हे अजून निश्चित होऊ शकलं नाही.
ADVERTISEMENT
वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितलं की, प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना अन्न देण्यापूर्वी त्याची चाचणी करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच या घटनेमुळे प्राणीसंग्रहालय तात्पुरतं बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी, आरोपींनी वापरला पेपर स्रे; चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मानवी वस्त्यांमध्ये आलेल्या तीन वाघ आणि बिबट्यांना चंद्रपूरहून गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले. गेल्या महिन्याच्या अखेरीस, याच केंद्रात तीन वाघांचा मृत्यू झाला. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक सतानिक भागवत यांनी सांगितलं की, त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते आणि 2 जानेवारी रोजी आलेल्या चाचणी अहवालात त्यांना H5N1 विषाणू (बर्ड फ्लू) ची लागण झाल्याचं समजलं.
या घटनेनंतर आता प्राणीसंग्रहालयांना खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "हभप वाल्मिक कराडवर 22 गुन्हे, त्यातील सात गुन्हे 307 चे", आरोपांची मालिका सुरूच, आव्हाडांचं खळबळजनक ट्विट
दरम्यान, या चार प्राण्यांच्या मृत्यूबद्दल विचारलं असता, वनमंत्री नाईक यांनी गुरुवारी सांगितलं की, "मला अजून प्रयोगशाळेकडून कोणताही अहवाल मिळालेला नाही. पण प्राथमिक माहितीनुसार, कोंबडी खाल्ल्यानंतर त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यूचं कारण हेच आहे का हे अजून निश्चित नाही. वन अधिकारी आम्हाला नंतर या प्रकरणाची माहिती देतील."
ADVERTISEMENT
