अकरावीच्या CET परीक्षेचं Time Table जाहीर

मुंबई तक

• 07:20 AM • 20 Jul 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मुल्यमापनाच्या जोरावर यंदाचा दहावीचा निकाल लावण्यात आला. परंतू अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात यंदा पहिल्यांदाच सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सीईटीसाठी (CET) २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मुल्यमापनाच्या जोरावर यंदाचा दहावीचा निकाल लावण्यात आला. परंतू अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात यंदा पहिल्यांदाच सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सीईटीसाठी (CET) २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

हे वाचलं का?

ही सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग १ व २ ), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.

कोरोना महामारीमुळे २०२०-२१ या वर्षासाठी विषयनिहाय २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. याच अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षेचे प्रश्न विचारले जाणार आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागेल.

जाणून घ्या कशी असेल अकरावीची यंदाची प्रवेश प्रक्रीया?

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

गुण – १००, बहुपर्यायी प्रश्न

परीक्षा OMR पद्धतीने, परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

CET परीक्षा देणाऱ्यांना ११ वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता १० वीच्या पद्धतीनुसार

    follow whatsapp