नाशिक: नाशिकच्या मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
संगमनेर (ता.दिंडोरी) येथून कनाशी येथे जात असताना हा अपघात झाला. मजुरांनी भरलेला ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. ज्यामध्ये असलेल्या १७ जणांपैकी सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस तसेच ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात आणलं. हे सर्व जण जळगाव जिल्ह्यातील असून रस्त्याचे काम करणारे मजूर होते. ज्यांचा कनाशीकडे जाताना अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वणी शहरातील खाजगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करत आहे. पाच ते सहा गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष, तीन महिला व चार वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. यात पती-पत्नीचा समावेश आहे.
नेमका अपघात कसा झाला?
एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये हे सगळे मजूर बसले होते. संगमनेर येथून मुळाणा बारीतून जात असताना अचानक चालकाच ट्रॅक्टरवरचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर एका मोठ्या दगडाला जाऊन धडकला. ज्यामुळे ट्रॅक्टरला लावण्यात आलेली ट्रॉली उलटली आणि हा भीषण अपघात झाला.
Chandrapur Accident: पेट्रोल टँकर-ट्रक धडकून भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू
अपघातातील मृतांची नावं:
-
वैशाली बाप पवार (वय ४ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
बेबाबाई रमेश गायकवाड (वय ४० वर्षे, रा. अंजनेरा ता. पारोळा जि. जळगाव)
-
सरला बापू पवार (वय ४ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
आशाबाई रामदास मोरे (वय ४० वर्षे, रा. अंजनेरा ता. पारोळा जि. जळगाव)
-
रामदास बळीराम मोरे (वय ४८ वर्षे, रा. अंजनेरा ता. पारोळा जि. जळगाव)
-
पोपट गिरीधर पवार (वय ४० वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
अपघातातील जखमींची नावं
-
सागर रमेश गायकवाड (वय २३ वर्षे, रा. अंजनेरा ता. पारोळा जि. जळगाव)
-
सुरेखा अशोक शिंदे (वय २२ वर्षे, रा. हिंगोणा ता. धरणगांव जि. जळगाव)
-
संगिता पोपट पवार (वय ४५ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
लक्ष्मण अशोक शिंदे (वय २१ वर्षे, रा. हिंगोणा ता. धरणगांव जि. जळगाव)
-
सुवर्णा पोपट पवार (वय १३ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
विशाल पोपट पवार (वय ११ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
आकाश पोपट पवार (वय १५ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
तनु दिपक गायकवाड (वय ३ वर्ष, कुसुंबा ता. जि. जळगाव)
-
दिपक बाबूलाल गायकवाड (वय ३० वर्षे, कुसुंबा ता. जि. जळगाव)
-
अनुष्का दिपक गायकवाड (वय १ वर्षे, कुसुंबा ता. जि. जळगाव)
-
मनिषा दिपक गायकवाड (वय २४ वर्षे, कुसुंबा ता. जि. जळगाव)
-
गणेश बापु पवार (वय ७ वर्षे, रा. उंदिरखेडा ता. पारोळा जि. जळगाव)
-
प्रिया संजय म्हस्के (वय ३ वर्षे, रा. जामनेर जि. जळगाव)
-
अजय नवल बोरसे (वय २१ वर्षे, रा. मिराड ता. भडगांव जि. जळगाव रा. उंदिरखेडा)
-
बापू पवार (वय ४५ वर्षे, ता. पारोळा जि. जळगाव)
ADVERTISEMENT