Trainer Aircraft Crash : जळगावमध्ये कोसळलं खासगी विमान, वैमानिक आणि ट्रेनर यांचा मृत्यू

मुंबई तक

• 02:30 PM • 16 Jul 2021

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वर्डी शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एक ट्रेनर एअरक्राफ्ट अर्थात शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारं एक विमान कोसळलं. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. वर्डी गावापासून सुमारे साडेतीन किमी अंतरावर ही घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या रामतलाव परिसरातील घनदाट जंगलात हे विमान कोसळलं. हा भाग अतिशय दुर्गम […]

Mumbaitak
follow google news

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वर्डी शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एक ट्रेनर एअरक्राफ्ट अर्थात शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारं एक विमान कोसळलं. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. वर्डी गावापासून सुमारे साडेतीन किमी अंतरावर ही घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या रामतलाव परिसरातील घनदाट जंगलात हे विमान कोसळलं. हा भाग अतिशय दुर्गम आहे. या घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरी प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक जखमी झाली आहे. तसंच कॅप्टन नूरल अमीन यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुजर ही या घटनेत जखमी झाली आहे.

हे वाचलं का?

दुपारी चारच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. छोटे विमान कोसळल्याचे पाहून त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. या अपघातात वैमानिक नूरल अमीन यांचा जागीच मृत्यू झाला. शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर या गंभीर जखमी असून चोपडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त विमान हे शिरपूर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वर्डी शिवारात कोसळले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असण्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी शिकाऊ महिला वैमानिकास मुंबई येथे पाठविण्यात आल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यावर दुःख व्यक्त केलं आहे. एनएमआयएमएस अकॅडेमी ऑफ अॅव्हिएशन यांच्या मालकीच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त धक्कादायक आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. दुर्दैवाने या खासगी विमानातील प्रशिक्षकाचा मृत्यू झाला असून ट्रेनी पायलट गंभीर जखमी झाली आहे, असं ट्विट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे.

    follow whatsapp