ADVERTISEMENT
Truecaller या अॅपचं नाव आपण ऐकलंच असेल. अनेक जण या अॅपचा देखील वापर करतात.
जर कोण्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला तर त्याच्या नावासकट इतर माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये Truecaller मुळे दिसते.
यासाठी अॅप यूजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील क्राऊडसोर्स केले जातात.
त्यामुळे आपण कधीही Truecaller वापरलेला नसेल तरीही त्याच्या डेटाबेसमध्ये आपलं नाव येऊ शकतं.
आता आम्ही आपल्याला Truecaller च्या डेटाबेसमधून आपलं नाव हटविण्याची सगळी प्रोसेस आपल्याला सांगणार आहोत.
यासाठी तुम्हाला तुमचं Truecaller अकाउंट डिअॅक्टिव्हेट करावं लागेल.
अकाउंट डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला अँड्रॉईड किंवा आयफोनवर आपलं अकाउंट सुरु करावं लागेल.
ज्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन About मध्ये जावं लागेल. इथे आपल्याला Deactivate अकाउंट यावर क्लिक करावं लागेल
पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला Truecaller अनलिस्ट पेज (http:www.truecaller.com/unlisting) ओपन करावं लागेल.
इथे आपल्या फोन नंबर कंट्री कोड जसं की, +9 19999999999 च्या फॉर्मेटमध्ये टाकावं लागेल
यानंतर आपल्याला I’m not robot च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ज्यानंतर आपल्याला अनलिस्ट फोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
Truecaller दावा करतं की, अनलिस्ट रिक्वेस्ट मिळाल्यानंतर फोननंबत हटविण्यासाठी 24 तासांचा वेळ लागू शकतो.
ADVERTISEMENT