मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. अनेक शासकीय रुग्णालयातील बेड्स भरल्याने आता रुग्णांवर व्हरांड्यात उपचार केले जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता मुंबईतील उच्चभ्रू रुग्णलयांमधील परिस्थिती देखील काही फारशी वेगळी नाही. नुकताच मुंबईच्या लिलावती रुग्णालयातील एक व्हीडिओ समोर आला आहे जो पाहून सध्या आरोग्य यंत्रणा किती गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे हे आपल्याला लक्षात येईल.
ADVERTISEMENT
लिलावती रुग्णालयातील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. ज्यामध्ये असं दिसून येतंय की, चक्क लिलावती रुग्णालयाच्या लिफ्टजवळील लॉबीमध्ये अनेक बेड टाकून त्याला कोविड वॉर्ड बनविण्यातं आलं आहे.
दरम्यान, रुग्णालयाबाहेर जे रुग्ण रांगा लावून उभे होते त्याची परवानगी घेऊन लिलावती प्रशासनाने आपल्या हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील लिफ्ट लॉबीचं कोविड वॉर्डमध्ये रुपांतर केलं.
अजित पवारांच्या बारामतीत भीषण परिस्थिती, कोरोना रुग्णांवर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात उपचार
याचाच एक व्हीडिओ आता समोर आला असून ज्यामध्ये आपल्या पाहायला मिळेल की, या संपूर्ण भागात रुग्णांची बरीच गर्दी आहे. तसंच अनेक कर्मचारी हे पीपीई कीट घालून या रुग्णांची शुश्रुषा करत आहेत.
दरम्यान, एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात असं म्हटलं आहे की, ‘आतापर्यंत कोविडला गांभीर्यांने न घेणाऱ्यांसाठी हा व्हीडिओ आहे. ही दृश्य लिलावती रुग्णालयातील आहेत. लिलावतीसारख्या रुग्णालयाने रुग्णांना उपचार मिळावे म्हणून लिफ्टजवळील लॉबीमध्ये बेड्स लावले आहेत. संपूर्ण लॉबी ही एका वॉर्डमध्ये बदलून गेली आहे.
लिलावती रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर जलील पारकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, ‘सर्व डॉक्टरांवर सध्या खूप दबाव आहे. डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी हे सगळेच जण दररोज आठ तासांहून अधिक वेळ फक्त पीपीई कीटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना कशाप्रकारचा त्रास होत असेल हे आपण लक्षात घ्या. आपण पहिलेच व्हीडिओ पाहिला असेल. पण रुग्णांची संख्या देखील खूप आहे. पण सध्या जी परिस्थिती आहे ते लक्षात घेता डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन हे बरेच प्रयत्न करत आहेत.’
महाराष्ट्रातील भाजपच्या माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
लिलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने असं म्हटलं आहे की, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने कर्मचार्यांनी लिफ्ट लॉबीमध्ये बेड्स टाकून रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. जेणेकरुन अनेकांचे प्राण आपल्याला वाचवता येतील.
बेडची कमतरता असल्याचे कबूल करत लिलावती रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, मुंबईतील प्रत्येक रुग्णालयाने मुंबई महापालिकेकडे बेड्स वाढविण्याचं आवाहन केलं पाहिजे. शहरातील दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता ही गोष्ट महत्त्वाची आहे.
मुंबईतील PSI चा कोरोनाने घेतला बळी, दुसरी लाट ठरतेय अधिक प्राणघातक
दरम्यान, गेले दोन दिवस राज्यात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता. तरी देखील गेल्या दोन दिवसात राज्यात 55 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या चार दिवसात दररोज 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे त्यामुळे मृत्यूदर देखील झपाट्याने वाढतोय.
ADVERTISEMENT