कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 2 महिन्यांनी द्या; केंद्राचं सर्व राज्यांना पत्र

मुंबई तक

• 01:39 PM • 22 Mar 2021

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस देण्यात येत आहेत. दरम्यान याचसंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकराने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहीलंय. या पत्राद्वारे कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्यात यावा अशी सूचना केली आहे. मुंबईतल्या […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस देण्यात येत आहेत. दरम्यान याचसंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकराने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहीलंय. या पत्राद्वारे कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्यात यावा अशी सूचना केली आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या खासगी रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रांविषयी मोठा निर्णय

NTAGI आणि NEGVAC यांनी लसीकरणासंदर्भात अभ्यास केला. या अभ्यासानंतर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्यात यावा असा निर्णय घेतलाय. केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे, कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा 4-8 आठवड्यांनी द्यावा. दरम्यान सध्या या लसीचा डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येतोय. मात्र कोव्हिशिल्ड लसीमधील दोन डोसमधील अंतर वाढवावं आणि ते 2 महिने असावं अशा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आणखी कोणी-कोणी घेतली लस?

केंद्र सरकारने लसीसाठी दिलेल्या सूचना या केवळ कोव्हिशिल्ड या लसीसाठी आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन या लसीचे डोस हे ठरलेल्या अंतराने देण्यात यावेत, असंही केंद्राने स्पष्ट केलंय.

कोव्हिशिल्ड ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार केली जातेय. या लसीचा देशातील कोरोना लसीकरणासाठी केला जात असून ही कोरोना लस इतर देशांनाही पुरवण्यात येतेय.

    follow whatsapp