आजी-माजी मुख्यमंत्री भाषणात व्यस्त, भाजपनं साधला डाव; दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश

मुंबई तक

• 04:45 AM • 22 Sep 2022

पालघर: शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. एका टोकाला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदे आहेत आणि या सगळ्यात भाजपही समोर येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. तसं म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी आम्हीचच खरी शिवसेना म्हणत भाजपसोबत नैसर्गिक युती केली आहे. असं असताना आता शिवसेनेतील नेते भाजपसोबत गेल्याने चर्चांना उधान आलं आहे. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु […]

Mumbaitak
follow google news

पालघर: शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. एका टोकाला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदे आहेत आणि या सगळ्यात भाजपही समोर येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. तसं म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी आम्हीचच खरी शिवसेना म्हणत भाजपसोबत नैसर्गिक युती केली आहे. असं असताना आता शिवसेनेतील नेते भाजपसोबत गेल्याने चर्चांना उधान आलं आहे.

हे वाचलं का?

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपनं डाव साधला

21 सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या गटनेत्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार, खासदार, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अमित शाहांनाही टार्गेट केलं. या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनीही दिल्लीतून संवाद साधला आणि ठाकरेंच्या भाषणाला उत्तर दिलं. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपने डाव साधला आहे. आता तो डाव एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना जड जाणार आहे.

महाराष्ट्र सदनातून एकनाथ शिंदे 20 मिनीटासाठी अचानक झाले गायब, चर्चांना उधान

दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच नाही तर शिंदे गटालाही हा मोठा धक्का समजला जात आहे.

विलास तरे, कृष्णा घोडा दोघही दिग्गज नेते

विलास तरे हे सुरुवातील शिवसेनेत असताना जिल्हा परिषद सदस्य होते, त्यानंतर बहुजन विकास आघाडीमधून 2009 आणि 2014 मध्ये बोईसरचे आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये तरेंनी परत शिवसेनेत प्रवेश केला पण विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत गेलेल्या कृष्णा घोडांचे 24 मे 2015 रोजी निधन झालं, त्याच जागेवर पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडांना विजय मिळाला.

मात्र शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारलं, हीच नाराजी सोबत घेऊन अमित घोडांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन नेत्यांमुळे शिवसेनेला पालघर आणि बोईसर मतदार संघात मोठा फटका बसणार, असं म्हटलं जातं. मात्र हे दोन नेते गेल्यामुळे नेमका उद्धव ठाकरे यांना धक्का बसणार की एकनाथ शिंदेंना हे आगामी काळात स्पष्ट होईल.

    follow whatsapp