Washim : देशात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.मंगळवारी पुण्यामध्ये 26 वर्षीय तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत, तोच राज्यात पुन्हा एका घटनेनं खळबळ उडाली आहे.वाशिम जिल्ह्यात 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT
26 फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातील अकोला नाका संकुलातील एका किराणा दुकानात शेजारी राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात राहणारी 7 वर्षांची निष्पाप मुलगी शेजारच्या किराणा दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. दुकानात उपस्थित असलेल्या 20 वर्षीय तरुणानं तिला सांगितलं की, त्याच्या दुकानात आईस्क्रीम नाही, पण शेजारच्या दुकानात ते मिळते.
हे ही वाचा >>Crime News : लग्न पुढे ढकलल्यामुळे तरूणाला राग आला , तरूणीच्या ऑफिसमध्ये जाऊन केला हल्ला...
काही वेळाने 7 वर्षांची निष्पाप मुलगी एका किराणा दुकानासमोरून जात असताना, त्या तरुणाने तिला दुकानात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलगी बराच वेळ घरी परतली नाही, तेव्हा तिची आई तिला शोधण्यासाठी बाहेर पडली आणि तिला ती एका किराणा दुकानात सापडली. मुलीची अवस्था पाहून आईला संशय आला. मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या घटनेला 24 तासही उलटले नव्हते, तेव्हा 27 फेब्रुवारीला रिसोड शहरात एका व्यक्तीनं 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. पोलिस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी जिल्ह्यातील रिसोड शहरातील एका संस्थेसमोर उभी होती. तेव्हा काही वेळाने एक व्यक्ती तिच्याकडे आला आणि म्हणाला की, मी तुझ्या दोन्ही मामांचा मित्र आहे. असं म्हणत त्यानं पीडितेला तिच्या मामांची नावंही सांगितली आणि तिला सोबत घेऊन गेला.
हे ही वाचा >>Kalyan : पतीचा मृत्यू झाल्यानंतर जवळीक वाढवली, महिलेवर अनेकदा बलात्कार केला, कल्याणमध्ये आरोपीला अटक
एवढंच नाही तर तो तिला असंही म्हणाला की मला मामाच म्हण. त्याच्या या प्रेमाने बोलण्यामुळे अल्पवयीन मुलगी भूलली आणि सोबत गेली. त्यानंतर आरोपीने तिला ज्यूस पाजला आणि नंतर तिला ऑटोमध्ये बसवून शहरापासून दूर एका निर्जन ठिकाणी नेलं. चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला आणि तिला परत आणून तिथंच सोडलं. तसंच जर तिने कुणाला सांगितलं तर तिला मारून टाकेन अशी धमकीही दिली.
त्यानंतर पीडितेच्या कुटुंबानं रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी 8 पथकं रवाना करण्यात आली आहेत, लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल. 24 तासांत घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाची भीती दिसत नाहीये, आणि त्याचबरोबर पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ADVERTISEMENT
