Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरला उत्तर देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, नेत्यांच्या पहिल्या फळीकडे काय काय जबाबदारी?

उद्धव ठाकरेंच्या अनेक आमदार, नेते, पदाधिकारी यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे गट यशस्वी ठरलेला दिसला. माजी आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि अनेक नगरसेवक त्यांच्यात सामील झाले आहेत. तसंच आणखी काही नेते आमच्याकडे येणार असल्याचं शिंदेंच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.

Mumbai Tak

ऋत्विक भालेकर

20 Feb 2025 (अपडेटेड: 20 Feb 2025, 08:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑपरेशन टायगरला उत्तर देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन

point

गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना यशस्वी होईल?

point

राज्यात येत्या काळात आणखी पक्षांतरं पाहायला मिळणार?

राज्यात शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला संघर्ष कायम सुरूय. शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूला आणण्यासाठी "ऑपरेशन टायगर" राबवलं जात असल्याची चर्चा आहे. तसंच, आता उद्धव ठाकरे गटही ही गोष्टी गांभीर्यानं घेतलं असून, ठाकरेंकडूनही अॅक्शन प्लॅन तयार केल्याचं दिसतंय. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत, संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे आणि अनिल देसाई यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षातील नुकसान कमीत कमी करण्यासाठी एक रणनीती आखली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: 'पैशांशिवाय काँग्रेस पक्ष उभा राहू शकतो का?', हर्षवर्धन सपकाळ थेट म्हणाले, "राजकारणात..."

आपली पकड मजबूत करण्यासाठी, ठाकरे गट दर मंगळवारी शिवसेना भवनात एक साप्ताहिक आढावा बैठक घेणार आहे. सर्व नेते पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर चर्चा करण्यासाठी आणि राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतील.

ठाकरेंची रणनीती काय?

- नेते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी भेट देतील.
- भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत.
- पक्षाविरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली जाईल.

दरम्यान, ठाकरेंच्या अनेक आमदार, नेते, पदाधिकारी यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे गट यशस्वी ठरलेला दिसला. माजी आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि अनेक नगरसेवक त्यांच्यात सामील झाले आहेत. दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावा केलाय की, ठाकरे यांच्या सेनेचे नऊपैकी पाच खासदार शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत आणि ठाकरे यांच्या सेनेचं आणि काँग्रेसचं काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यात सामील होण्यास तयार आहेत.

हे ही वाचा >> "अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप, आधी शासनाचा जीआर..."', धनंजय मुंडेंनी घेतला अंजली दमानीयांचा समाचार

राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र होत असताना, ठाकरे यांचा गट आपली जागा वाचवण्यासाठी सज्ज होत आहे. पक्षातील पुढील पक्षांतर रोखण्यासाठी पक्षाच्या पडताळणी केली जातेय.  14 पदाधिकारी, 43 उपनेते आणि 10 सचिवांची ही समिती असणार आहे. ही समिती दर आठवड्याला, सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह 14 प्रमुख नेते मुंबईत भेटून पक्षाच्या भविष्यातील कृतीवर चर्चा करतील. त्यामुळे या प्लॅनचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp