Exclusive: ‘माझ्यावर ठाकरेंचं प्रचंड ओझंय’, आव्हाडांनी सांगितला ‘तो’ इंटरेस्टिंग किस्सा

मुंबई तक

06 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Jitendra Awhad Exclusive Interview: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे सध्या त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. भाजपच्या (BJP) वतीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. याच सगळ्याबाबत जितेंद्र आव्हाडांनी मुंबई Tak ला (Mumbai Tak) एक विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप तर खोडून काढलेच. पण त्याशिवाय त्यांनी […]

Mumbaitak
follow google news

Jitendra Awhad Exclusive Interview: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे सध्या त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. भाजपच्या (BJP) वतीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. याच सगळ्याबाबत जितेंद्र आव्हाडांनी मुंबई Tak ला (Mumbai Tak) एक विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप तर खोडून काढलेच. पण त्याशिवाय त्यांनी शिवसेना (Shivsens UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी I(Uddhav Thackeray) एक अतिशय भन्नाट किस्साही सांगितला. (uddhav thackerays burden of love on me jitendra Awhad told interesting story exclusive interview)

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड हे सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत त्यांच्या सोबतच होते. यामुळे ठाण्यातील शिवसैनिक मात्र, नाराज झाले असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. जेव्हा याचबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातील आजवर कधीही उघड केलेल्या भावना मुंबई Tak च्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलून दाखवल्या.

पाहा जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले:

प्रश्न: उद्धव ठाकरे हे जेव्हा ठाण्यात आले तेव्हा जेवढे शिवसैनिक पुढे नव्हते तेवढे तुम्ही पुढे होतात. हे काय नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे का?

जितेंद्र आव्हाड: ‘महाराष्ट्रालाही माहित आहे की, माझं त्या माणसावर मनापासून प्रेम आहे. म्हणजे आई-वडिलांऐवढंच माझं प्रेम पवार साहेबांवर आहे. किंबहुना त्याहूनही जास्त.. कारण आता आई-वडील नाहीत. पवार साहेब माझ्यासाठी सर्वस्व आहेत. जर त्यांनी मला सांगितलं की, बंद कर ही बडबड.. हे सगळं. तर मी बंद करेन, काही बोलणार नाही.’

‘पण मला एक प्रसंग आठवतो. जेव्हा मी कोरोनात वाईट अवस्थेत होतो. म्हणजे मला माझी अवस्थाही माहीत नव्हती. मी अंगावर काढलं आणि कोसळलो. त्यानंतर काय झालं ते आठवतच नाही. तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की, मिलिंदचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, उद्धव साहेबांचा फोन आहे. त्यांनी सांगितलं की, मला ज्युपिटरमध्ये ठेवायचं नाही.’

उद्धव ठाकरेंवर ठाण्यातील शिवसैनिक नाराज? कारण ठरले जितेंद्र आव्हाड!

‘माझी पत्नी त्यांना म्हणाली की, ज्युपिटरचे आणि त्याचे मैत्रीचे संबंध आहेत आणि हॉस्पिटल माझ्या घराजवळ आहे. तर तो तिथे कम्फर्टेबल आहे. त्यानंतर दुसरा निरोप आला की, नाही.. तिथे ठेवायचं नाही.’

‘पवार साहेबांचा माझ्या पत्नीला फोन आला की, मी आणि उद्धव निर्णय घेऊ. तुम्ही कोणी मध्ये पडू नका. बायकोने सांगितलं की, साहेब तुम्ही एकदा सांगितलं तर प्रश्न येतच नाही. आम्ही काही बोलायचा. त्यानंतर मला दुसरीकडे शिफ्ट केलं. म्हणजे मी शेवटची घंटा वाजवलेली होती.’

‘खरं तर त्यांनी एवढी कशाला मला एवढी रातोरात मेहनत करायची, शिफ्ट वैगरे करायचं. दररोज सकाळी फोन करायचा. डॉक्टरांना रात्री फोन करायचा.. जितेंद्र कसा आहे.. काय आहे. पवार साहेबांनी फोन करायचा..’

‘शेवटी यातूनच माणुसकीचा झरा दिसतो ना, प्रेम दिसतं ना.. जेव्हा मी जवळजवळ मृत्यूच्या दाढेत गेलो होतो. डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं उद्धव ठाकरेंना की, साहेब जरा अवघड आहे. म्हणजे माझ्या पत्नीला तर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही प्रार्थना सुरू करा. तुमच्या पतींची प्रकृती गंभीर आहे.’

“अफझल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षा….” जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना टोला

‘मी त्या सगळ्यातून बाहेर आलो.. मी बाहेर आल्यानंतर त्या माणसाच्या उपकाराचं ओझं माझ्या मनावर नसेल? मी इतका घाणेरडा माणूस नाहीए. मी इतका कृतघ्न नाही.’

‘जे उद्धव ठाकरेंनी केलं त्यांचं प्रेमाचं ओझं.. म्हणजे पवार साहेबांच्या प्रेमाचं ओझं.. म्हणजे दुनिया एकतरफ शरद पवार एकतरफ.. मी काय हे आज नाही बोलत.’

‘मी कधीही दुसरा दरवाजा चढलेलो नाही.. मला पवार साहेबांशिवाय दुसरं काहीही नाही. माझ्या राजकीय जीवनात. मी उद्धव ठाकरेंच्या इथे गेलो ते फक्त माणूसकी म्हणून गेलो. की, हा माणूस पहिल्यांदा ठाण्यात येतोय आणि मी घरी आहे. तर आपण जाऊन उभं राहू. मी पवार साहेबांसाठी उभा राहतो. मी गेलो त्यांच्यासाठी.’

‘मी जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक शिवसैनिक माझ्या कानात बोलला की, साहेब फार बरं झालं तुम्ही आलात ते. फार बरं झालं तुम्ही आलात.. सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. अगदी केदार दिघेंसह. मी नावच घेऊन सांगतो.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

    follow whatsapp