अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात

मुंबई तक

• 12:26 PM • 11 May 2021

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी छोटा राजनचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमीही समोर आली होती. परंतू एम्स रुग्णालयाने या बातमीचं खंडन केलं होतं. यानंतर राजनला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ एप्रिलपासून राजनवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. […]

Mumbaitak
follow google news

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी छोटा राजनचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमीही समोर आली होती. परंतू एम्स रुग्णालयाने या बातमीचं खंडन केलं होतं. यानंतर राजनला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

२२ एप्रिलपासून राजनवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजनला पुन्हा एकदा कडक सुरक्षा व्यवस्थेत तिहार जेलमध्ये आणण्यात आलं आहे. अपहरण, हत्या आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये छोटा राजनवर देशभरात ७० गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील पत्रकार जे.डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन हे नाव अंडरवर्ल्डमध्ये चांगलंच गाजलं. सुरुवातीला कुख्यात गँगस्टर दाऊदसोबत काम करत असलेल्या छोटा राजनने यानंतर स्वतःची वेगळी गँग तयार करत दाऊदलाच आव्हान दिलं होतं. २०१५ साली छोटा राजनला इंडोनेशियामधून भारतात आणण्यात आलं होतं. बाली येथे राजनला अटक करण्यात आली होती, त्यानंतर CBI ने त्याला भारतात आणलं. राजनविरोधात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल असुनही त्याला मुंबईत आणण्यात आलं नाही. दाऊद विरुद्ध राजन यांच्यातील गँगवॉरच्या भीतीमुळे सीबीआयने त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्येच ठेवलं होतं.

तिहार जेलमध्येच छोटा राजनवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटला चालवण्यात येत होता. २६ एप्रिल रोजी तिहार जेलमधील एका अधिकाऱ्याने छोटा राजन आज सुनावणीसाठी येणार नाही कारण त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं.

    follow whatsapp