घरापासून काही अंतरावर असलेल्या शौचालयास गेलेल्या महिलेवर बलात्कार करुन तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी गावात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
मृत महिला काही दिवसांपूर्वी भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी लोणी येथे भावाकडे आली होती. तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिला दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर गेली, परंतू बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्यामुळे घरच्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी एका झाडाखाली तिचा मृतदेह आढळून आला.
भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शिर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पहा, हीच काय केलं’
या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेवर बलात्कार करुन तिची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर : धक्कादायक! 27 वर्षीय जावयाचा 45 वर्षीय सासूवर बलात्कार
ADVERTISEMENT