केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामान आज संसदेच्या सभागृहात ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट, शेतकरी आंदोलनाचा प्रश्न या पार्श्वभूमीवर सितारामान सामान्य करदात्यांना काय सवलती देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लॉकडाउनमध्ये आपली नोकरी गमावलेल्या नोकरदार वर्गालाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
ADVERTISEMENT
मात्र कोणताही अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याआधी प्रत्येक अर्थमंत्र्यांला काही महत्वाच्या प्रक्रीया पूर्ण कराव्या लागतात. आजचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सितारामन यांनाही हे टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत.
१) साडेआठ वाजल्याच्या सुमारास अर्थमंत्री सितारामन आपल्या शासकीय निवासस्थानातून नॉर्थ ब्लॉककडे रवाना होतील.
२) नऊ वाजता अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमसोबत चर्चा आणि फोटोसेशन झाल्यानंतर सितारामन राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील.
३) दहा वाजल्याच्या सुमारास निर्मला सितारामन संसद भवनात आपल्या अर्थसंकल्पासोबत दाखल होतील
४) सव्वा दहा वाजता अर्थसंकल्प पास करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची बैठक
५) ११ वाजता निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.
६) दुपारी ३ वाजता अर्थमंत्री सितारामन पत्रकार परिषदेत संवाद साधतील
७) संध्याकाळी पावणे पाच वाजल्याच्या दरम्यान रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि सीईओ सुनीत शर्मा आपल्या इतर अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची विस्तारपूर्ण माहिती देतील.
ADVERTISEMENT