निर्मला सीतारामन जेजुरीच्या खंडोबा चरणी लीन, मिशन बारामती यशस्वी होण्यासाठी मागितला आशीर्वाद?

मुंबई तक

• 05:08 AM • 23 Sep 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. भाजपचं मिशन बारामती हे सध्या चांगलंच चर्चेत आहे. अशात निर्मला सीतारामन यांचा हा दौराही महत्त्वाचा मानला जातो आहे. आज काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. भाजपचं मिशन बारामती यशस्वी होऊ दे म्हणून त्यांनी मनोमन आशीर्वाद मागितला असल्याची चर्चा आहे. बारामती दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यावरच […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. भाजपचं मिशन बारामती हे सध्या चांगलंच चर्चेत आहे. अशात निर्मला सीतारामन यांचा हा दौराही महत्त्वाचा मानला जातो आहे. आज काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. भाजपचं मिशन बारामती यशस्वी होऊ दे म्हणून त्यांनी मनोमन आशीर्वाद मागितला असल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

बारामती दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यावरच भडकल्या निर्मला सीतारामन, कारण…..

निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं आहे?

भाजपच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बारामतीमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मी या लोकसभा मतदारसंघाचा दौरा, संवाद, विविध पैलूंवर चर्चा करत आहे. ही भेट भाजपच्या मोठ्या कार्यक्रमाचा एक भाग आहे ज्यात १४४ मतदारसंघ निवडण्यात आले आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी खंडोबाची आरतीही केली. तसंच मनोभावे प्रार्थनाही केली. मिशन बारामती यशस्वी होऊ दे म्हणून त्यांनी खंडोबाला मनोमन प्रार्थना केल्याचीही चर्चा जेजुरीत रंगली आहे. निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. भाजप या ठिकाणी कसं बळकट होईल याकडे त्या लक्ष ठेवून आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

मिशन बारामती नेमकं काय आहे?

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिशन बारामती आखलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवर पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडून गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. हेच भाजपचं मिशन बारामती आहे. त्याची सुरूवात निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याने झाली आहे.

निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवार काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार म्हणाले ”अमुक अमुक जण बारामतीला येणार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे. अरे येऊदे ना बारामतीला, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का? ती सर्वाची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्ट्रात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले” असं म्हणत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती.

    follow whatsapp