केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना हाताळणीबाबत मुंबई आणि पुणे मॉडेलचं कौतुक केलं आहे. त्यावरून आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. तसंच पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणालेत सुब्रण्यम स्वामी ?
आजच मोदी सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. कोरोनाची परिस्थिती मुंबईने चांगल्या रितीने हाताळल्याचं म्हटलं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. कोरोना परिस्थितीच्या बाबतीत त्यांचा आदर्श घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सर्वात आधी मी ही गोष्ट म्हटली होती. त्यावेळी मला अनेकांनी नावं ठेवली.. आता केंद्रानेच उद्धव ठाकरेंचं चांगलं काम मान्य केलं आहे. आता अंध आणि गंध भक्त कुठे गेले? घाबरलेल्या कोल्ह्यांसारखे गायब झाले का? या आशयाचं ट्विट स्वामी यांनी केलं आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही का होतायत मृत्यू?
मुंबई मॉडेलचंही आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक
मुंबई हे खूप मोठं शहर आहे, मात्र कोरोना रूग्ण हाताळणीसाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने काही महत्त्वाची पावलं उचलली. हॉस्पिटल्समधली तयारी, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनची तयारी या सगळ्या गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने उपलब्ध केल्या. कोरोना आटोक्यात येण्यासाठी मुंबईतल्या 24 वॉर्डांमध्ये 24 कंट्रोल रूम तयार कऱण्यात आले. त्यानंतर टेस्टचे निकाल जेव्हा यायचे तेव्हा त्याची वॉर्ड प्रमाणे विभागणी करण्यात आली. हे अहवाल त्या त्या वॉर्डाच्या कंट्रोल रूमकडे धाडण्यात आले. या कंट्रोल रूममध्ये टेलिफोन ऑपरेटर्स, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, अँब्युलन्स या सगळ्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या. कुठल्या वॉर्डातले लोक पॉझिटिव्ह आले आहेत ते माहित करून घेऊन त्या लोकांना रूग्णालयात पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. एक आयटी प्लॅटफॉर्म तयार केला गेला. एक डॅशबोर्ड तयार कऱण्यात आला त्यावर रूग्णालयातल्या बेड्सची उपलब्धता टाकण्यात आली. कोणत्याही रूग्णाला बेड हवा असताना कसा मिळू शकेल याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात आली. या प्रकारे योग्य प्लानिंग केल्याने मुंबईतही कोरोना संख्या कंट्रोलमध्ये आली.
‘महाराष्ट्रातील फक्त 27 टक्के कोरोना योद्ध्यांना मिळालं पंतप्रधान गरीब कल्याण विमा संरक्षण’
1 मे रोजी काय म्हणाले होते सुब्रमण्यम स्वामी?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र सरकारने आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची पावलं उचलली आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत सरकार राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांचं भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे.आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्वामी यांनी ठाकरे सरकारचं कौतुक करत, राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावून ठेवण्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.
ADVERTISEMENT