नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राणेंनी त्यांच्या घराबाहेर राडा करणाऱ्या शिवसेनेला आव्हान देखील दिलं आहे. ‘तुम्हाला घरं नाहीत? मुलं बाळं नाहीत? तेवढंच आठवणीत ठेवा’ असंही राणे यावेळी म्हणाले. यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. यावेळी नारायण राणेंनी असंही म्हटलं आहे की, आपण गुन्हा केलेलाच नाही.