Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुरक्षारक्षकाला कॉलर धरून धक्काबुक्की, प्रकरण काय?

घडलं असं की, मुक्ताई नगरयेथील शाळकरी, कॉलेज मधील मुली यात्रेसाठी गेल्या होत्या. तिथे एका भाई नामक गुंडांच्या टोळीने मुलींची छेड काढत व्हिडीओ काढल्याच्या प्रकार घडला.

Mumbai Tak

मुंबई तक

02 Mar 2025 (अपडेटेड: 02 Mar 2025, 02:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली

point

यात्रेमध्ये फिरत असताना टोळक्यानं दिला त्रास

point

गुंडांना रोखणाऱ्या सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की

मुक्ताई नगरमध्ये मुक्ताई देवीची यात्रा दोन दिवसा पूर्वीच झाली. या यात्रेमध्ये गावगुंडांनी थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या घटनांमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यातच आता थेट भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्यानं का मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी सुरक्षारक्षकही तिथे होते, मात्र गुंडांनी त्यांनाही जुमानलं नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Walmik Karad जेलच्या ज्या बराकमध्ये आहे, तिथले CCTV बंद? दादासाहेब खिंडकर यांचे गंभीर आरोप

घडलं असं की, मुक्ताई नगरयेथील शाळकरी, कॉलेज मधील मुली यात्रेसाठी गेल्या होत्या. तिथे एका भाई नामक गुंडांच्या टोळीने मुलींची छेड काढत व्हिडीओ काढल्याच्या प्रकार घडला. रक्षा खडसे यांच्या बॉडीगार्डने त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचीही कॉलर गुडांनी धरली. अश्या परिस्थीत केंद्रीय मंत्र्यांची मुलगी देखील सुरक्षित नाही, तर बाकी सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल या वेळी रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >>Dhananjay Munde : "धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार", फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधान

या घटनेनंतर रक्षा खडसे या स्वत: एक आई म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. मी गुजरातला असताना, मुलगी यात्रेला जायचं म्हणाली. तेव्हा मी सुरक्षारक्षकाला आणि आमच्याकडे काम करणाऱ्या काही मुलांना तिच्या सोबत पाठवलं. तिथे कुणी भोई नावाच्या मुलाने त्रास दिला, मुलींच्या मागे फिरला, पाळण्यातही आमच्या लोकांना उतरवून तिथे बसले. आमच्या गार्डने रोखलं असता, त्यांनाही कॉलर पकडून धमकावलं. ही माहिती स्वत: रक्षा खडसे यांनी माध्यमांना दिली.

रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. "केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबत छेडछाडीचा प्रकार होत असेल, तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गृहमंत्र्यांना सवाल केला. रक्षा खडसे यांची मुलगी व माझी भाचीची छेडछाड करण्याचा प्रकरण दोन दिवस उलटूनही, पोलिसांकडून कारवाई केली जात नाही तर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करते आहे. रोहिणी खडसे यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केले, गुन्हेगारांवर राजकीय दबाव वापरून कारवाई करण्यात आली नाही."  असं रोहिणी खडसे म्हणाल्या.


    follow whatsapp