नागपूर: नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन आदेश जारी करण्यात आलेले होते. परंतु कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने निर्बंध सोमवार 22 मार्च 31 मार्चपर्यंत नागपूर शहरासाठी लागू करण्यात आलेले आहे.
ADVERTISEMENT
नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि लॉकडाऊनला व्यापारी संघटनांचा विरोध लक्षात घेता निर्बंध जरी कडक असले तरी त्यात काही प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे.
आधी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी होती. परंतु नवीन आदेशात व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता काही बदल करण्यात आले आहेत. आता सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी चारपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच रेस्टॉरंट हॉटेल 50 टक्के क्षमतेने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असतील. होम डिलिव्हरी साठी रात्री अकरा वाजेपर्यंत किचन सुरू ठेवता येईल.
नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार: नितीन राऊत
याशिवाय दूध डेअरी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यामुळे व्यवसायिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग आणि महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली आहे.
नागपूर शहरात निर्बंधांसह अनलॉकमध्ये काय सुरू असणार?
1. अत्यावश्यक सेवा शहरातील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू असतील
2. रेस्टॉरंट हॉटेल खाद्यगृह 50 टक्के क्षमतेने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू
3. दूध दुकाने-डेअरी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असेल
4. प्रवासी वाहतूक सेवा 50% क्षमतेने, चार चाकी वाहनावर एक अधिक दोन प्रवासी, दुचाकीवर डबलसीट परवानगी देण्यात आलेली आहे.
5. वैद्यकीय, मेडीकल स्टोअर,
6. निवासी हॉटेल लॉज 50% क्षमतेने सुरू
7. बांधकाम, उद्योग ,कारखाने,
8. बँक, पोस्ट, विमा, शासकीय व निमशासकीय व खाजगी कार्यालय क्षमतेच्या 25% उपस्थित सुरू
9. वाचनालय अभ्यासिका 50% क्षमतेने सुरू असेल.
काळजीत भर! महाराष्ट्रात दिवसभरात Corona रुग्ण संख्या ३० हजारांच्यावर
निर्बंधासह अनलॉकदरम्यान काय बंद असणार?
1. धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असतील मात्र पाच लोकांच्या उपस्थित नियमित पूजा आरती करता येईल.
2. धार्मिक व राजकीय सभा सामाजिक कार्यक्रम बंद
3. सांस्कृतिक कार्यक्रम यांना बंदी असेल
4. सभागृह, मंगल कार्यालय, लॉनमधील लग्न समारंभ यावर बंदी असणार आहे
5. शहरातील उद्याने
6. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद असतील
7. सर्व आठवडी बाजार बंद असतील
8. जलतरण तलाव, व्यायाम शाळा, जिम, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद असणार आहेत.
दरम्यान, निर्बंधांसह अनलॉक करण्यात यावा अशाच प्रकारची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नागपुरात पूर्ण लॉकडाऊन न लावता निर्बंध कडक करण्यात यावे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत केली होती. त्याचा विचार करता पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता. ज्याची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT