एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात बळीराजासमोर आज अवकाळी पावसाचं मोठं संकट येऊन उभं राहिलं. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. धारुर तालुक्यातील कोटरबन, चिंचवन, वडवणी, धारुर या गावांना पावसाचा चांगलाच फटका बसला.
ADVERTISEMENT
यावेळी मुसळधार पावसामुळे अनेक गावांत वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालेलं पहायला मिळालं. धारुर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गावातले नदी-नाले ओसंडून वाहत होते. या पावसामुळे अनेक फळबागा, शेती आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं. काही भागांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे चारचाकी गाडी वाहून गेली. तसेच काही घरांवरचे पत्रेही उडून गेले.
ADVERTISEMENT