उत्तर प्रदेशातला एक घृणास्पद व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ या ठिकाणी थुंकी लावून पोळ्या लाटणाऱ्या एका माणसाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातला जो व्हीडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये हे स्पष्ट दिसतं आहे की एक ढाब्यावर काम करणारा एक माणूस थुंकी लावून पोळी लाटतो आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर या माणसाचा व्हीडिओ व्हायरल झाला याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येते आहे.
कॅमेरात कैद झालं घृणास्पद कृत्य
थुंकी लावून पोळी लाटताना हा व्हीडिओ लखनऊच्या कोकोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. इमाम अली ढाबा नावाचा एक ढाबा तिथला हा व्हीडिओ आहे. रोटी तयार करणारा कर्मचारी तंदूमध्ये थुंकी लावून ती लाटतो आणि मग ती भाजो आहे. या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर कुणीतरी व्हायरल केला ज्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून सहा जणांना अटक केली. या व्हायरल व्हीडिओ संदर्भातल पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
या प्रकरणी पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांनी सांगितली की हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. व्हीडिओच्या आधारे आम्ही हॉटेल मालक याकूब, कर्मचारी दानिश, हाफिझ मुख्तार आणि अन्वर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर कारवाईही करण्यात येते आहे.
थुंकी लावून पोळी बनवण्याची उत्तर प्रदेशातली ही पहिली घटना नाही. याआधीही या ठिकाणचे असे काही व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये विवाह सोहळ्यात थुंकी लावून पोळ्या लाटतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला हो. गेल्यावर्षी मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन भागात झालेल्या हद्दीत तंदूर कारागीर नौशाद याला थुंकी लावून पोळ्या बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT