पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोव्हिड 19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्यात आलं आहे. पनवेल महापालिकेने यासंदर्भातलं पत्रक काढलं आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातही लसीकरण पुढील लसींचा पुरवठा होईपर्यंत लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत अडसर-राजेश टोपे
सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोव्हिड-19 लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 80 हजार 719 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसींचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.
100 टक्के Lockdown मुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष-फडणवीस
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलं होतं?
रोज सहा लाख लसी देण्याचं लक्ष्य महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत अडसर येतो आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. गावागावांमध्ये 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांना लस देण्यात येते आहे. मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं. त्यांना लस पुरवण्यासाठी पोटतिडकीने विनंती केली आहे. कोव्हॅक्सिन या लसीची मागणी महाराष्ट्रात जास्त होते आहे त्यामुळे कोव्हॅक्सिन आधी द्या त्यानंतर कोव्हिशिल्ड लसी पुरवा असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात नवा स्ट्रेन?
राजेश टोपे यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला अशी शंका येते आहे की महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनही आला आहे. या स्ट्रेनमुळे जास्तीत जास्त लोकांना कमी कालावधीत कोरोनाची बाधा होते आहे. आम्ही काही नमुने हे तपासणीसाठी NCDC कडे पाठवले आहेत. त्यांनी आम्हाला यासंबंधीचा अहवाल दिल्यानंतरच यासंबंधातली स्पष्टता येईल.
नकोसा रेकॉर्ड! देशात कोरोना वाढलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रात
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. बुधवारी महाराष्ट्रात 59 हजारांपेक्षा जास्त कोव्हिड रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रोज वाढणारी संख्या ही महाराष्ट्राची चिंता वाढवत असतानाच आता दुसरीकडे लसींचा साठाही अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारीच पत्रकार परिषदेत ही बाब नमूद केली होती. सध्या राज्यात 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लस देण्यात येते आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होते आहे. अशात आता लसींचा पुरवठा अपुरा पडू लागल्याने सातारा आणि पनवेल या दोन ठिकाणी लसीकरण मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT