वसई : भोंदूगिरी करुन सोनं लुटणाऱ्या बाबाला अटक

मुंबई तक

• 01:32 PM • 05 Nov 2021

वसईतल्या माणिकपूर पोलिसांनी भोंदूगिरी करुन सोनं लुटणाऱ्या एका ढोंगी बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी या बाबाकडून १२ लाखांचं सोनं जप्त केलं आहे. नूर अलीउद्दीन सलमानी असं या बाबाचं नाव आहे. वसई पश्चिमेत राहणाऱ्या एका महिलेला या बाबाने आपल्या अंगात कालीमाता येत असल्याचं भासवत तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. बाबाच्या या आमिषाला […]

Mumbaitak
follow google news

वसईतल्या माणिकपूर पोलिसांनी भोंदूगिरी करुन सोनं लुटणाऱ्या एका ढोंगी बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी या बाबाकडून १२ लाखांचं सोनं जप्त केलं आहे. नूर अलीउद्दीन सलमानी असं या बाबाचं नाव आहे.

हे वाचलं का?

वसई पश्चिमेत राहणाऱ्या एका महिलेला या बाबाने आपल्या अंगात कालीमाता येत असल्याचं भासवत तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. बाबाच्या या आमिषाला बळी पडून महिलेने घरातलं सर्व सोनं पूजेसाठी मागवून घेतलं. पुजेदरम्यान हातचलाखी करुन या बाबाने सोन्याचे दागिने असलेली पिशवी बदलून महिलेला दगड ठेवलेली पिशवी दिली.

दिवाळीत मामाच्या घरी निघालेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला, रस्ते अपघातात दोन्ही भावंडांचा मृत्यू

इतकच नव्हे तर ही पिशवी घरी गेल्यानंतर ७ दिवसांनी उघड असंही या बाबाने महिलेला सांगितलं. सात दिवसांनी ही पिशवी उघडल्यानंतर महिलेला या पिशवीत सोन्याऐवजी दगड सापडले, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं या महिलेला लक्षात आलं. यानंतर महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात बाबाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या बाबाला अटक केली आहे. या बाबाने अशाच पद्धतीने इतरांना फसवलं असल्याचा पोलिसांना संशय आहे.

    follow whatsapp