लग्नाचं आमिष दाखवून तरुणीव अत्याचार करणाऱ्या आरोपीला वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पीडित तरुणीशी शाररिक संबंध ठेवल्यामुळे तरुणी पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. यानंतर आरोपी हा तेलंगणाला पळून गेला होता. यानंतर तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर वसई रोड रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
ADVERTISEMENT
पीडित तरुणी वसई रोड रेल्वे स्थानकाबाहेर फळ विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. यादरम्यान डिसेंबर २०२० मध्ये तरुणीची ओळख शेष प्रसाद ऊर्फ दीपू हिरालाल पांडे याच्याशी झाली. पांडे हा रेल्वे स्थानकात हमालीचे काम करून वसई रोड स्थानकातच राहायचा. रोजच्या गाठीभेटीतून पांडे याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले. लग्न करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली.
पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुंबीय हादरले. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग लोहमार्ग पोलिसांना सांगितला.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पांडे याने पळ काढला व मोबाईल क्रमांकही बंद केला. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांचे पथक पांडे याच्या मूळगावी मध्य प्रदेश येथे दाखल झाले.तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता पांडे हा तेलंगणा राज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांना समजले. लोहमार्ग पोलिसांचे पथक हैदराबादला रवाना झाले. वेशांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT