एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन सूरत मार्गे गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले आणि परत आले. याच घटनाक्रमावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना डिवचलं. यावेळी त्यांनी गुजराततेत गेलेल्या फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावर मिश्किल भाष्य केलं.
ADVERTISEMENT
“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल; सुरतेला पळून गेले”
“हे बंडखोर असते. यांना क्रांती करायची असती, तर हे जागेवर उभे राहिले असते. हे जागेवर उभे राहिले नाहीत. तर पळून गेले. पळून कुठे गेले, तर आधी सुरतेला. तिथून गुवहाटीला गेले. तिथे काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल बघितलं”
फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात येणार; ठाकरेंचा शिंदे गटाला चिमटा
“मला कालपरवा कुणीतरी सांगितलं की, आदित्य घाबरू नको. वेदांता-फॉक्सकॉन तुमच्याकडेच परत येणार. तुला कळत नाहीये, ते आधी गुजरातला गेलेत. तिथून गुवाहाटीला जाणार आणि मग परत आणणार. नंतर महाराष्ट्रात येणार. ते थेट महाराष्ट्रात कसे येणार. हेच आपल्या राज्यात झालेलं आहे. आपण गद्दारीला बंड समजायला लागलोय”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डिवचलं.
vedanta foxconn Project : ‘तुम्ही भित्रे होतात, आम्ही 40 वार पाठीवर घेतलेत आणि आणखी घेऊ’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला
आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रा : ‘गद्दारीला ते उठाव समजायला लागेलत’
“गद्दारीला क्रांती समजायला लागलोय. गद्दारीला उठाव समजायला लागलोय. हे महाराष्ट्रातील जनता नाही, तर हे ४० गद्दार लोक समजायला लागेल आहेत. ज्या शिवसेनेनं त्यांना सर्व काही दिलं. शिवसैनिकांनी डोक्यावर घेतलं. मग काय चुक झाली. मला एकजण म्हणालं की, आदित्य तुमची चूक हीच झाली की तुम्ही त्यांना लायकीपेक्षा जास्त दिलं. गरजेपेक्षा जास्त दिलंय आणि त्यांना अपचन झालंय”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर शरसंधान साधलं.
Foxconn-vedanta : व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवरील ‘तो’ मेसेज गोंधळ निर्माण करण्यासाठी; आदित्य ठाकरेंचा खुलासा
‘शिवसेना की खोके सरकार… तुम्ही कुणासोबत उभे राहणार?’
यावेळी आदित्य ठाकरेंनी सभेला उपस्थित कार्यकर्त्यांना सवाल केला की, “तुम्ही कुणासोबत उभे राहणार, शिवसेनेसोबत की या खोके सरकार सोबत? तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत उभे राहणार की, गद्दारांसोबत उभे राहणार? ही राजकीय गद्दारी नाहीये, तर माणुसकीची गद्दारी झालीये. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वकाही दिलं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला राजकीय ओळख दिली. सरकार नसताना तुम्हाला जपलंय. तरीही तु्म्ही पाठीत वार केला”, असं आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना म्हणाले.
ADVERTISEMENT