वेदांता-फॉक्सकॉन कंपन्यांची भागादारी असलेला प्रोजेक्ट (vedanta-foxconn semiconductor plant) गुजरातमध्ये गेल्यानं नुकतेच सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर चौहीबाजूंनी टीका होऊ लागलीये. त्यातच एक बातमी व्हायरल होतं असून, सुभाष देसाई खोटं बोलत असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून केली जातेय. २०२० मधील या बातमीवरूनही बरंच रणकंदन सुरू आहे.
ADVERTISEMENT
तैवान स्थित फॉक्सकॉन आणि वेदांता या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून भारतात आता सेमीकंडक्टर चिप निर्मिती केली जाणार आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्लांट महाराष्ट्रात उभारला जाणार होता, मात्र अचानक गुजरातमध्ये हा हा प्लांट होणार असल्याचं समोर आलं आणि राजकीय गदारोळ सुरू झाला.
फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्ट गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात आता हा प्रोजेक्ट आधीच महाराष्ट्रातून परत गेला होता, अशी एक बातमी व्हायरल झालीये.
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातला, काय आहे क्रोनोलॉजी?
फॉक्सकॉनसंदर्भात सुभाष देसाईबद्दल व्हायरल झालेल्या बातमी मागचं सत्य काय?
महाराष्ट्रात प्रस्तावित असलेलं युनिट महाराष्ट्रात सुरू करणार नाही, असं सुभाष देसाईंचं विधान असलेलं हे वृत्त फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानंतर व्हायरल झालंय. याच वृत्ताचा आधार घेऊन भाजपच्या नेत्यांनी सुभाष देसाई आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीये.
सुभाष देसाईंचं विधान असलेलं हे वृत्त जानेवारी २०२० मधील आहे. फॉक्सकॉन कंपनी ५ बिलियन म्हणजे तब्बल ३५ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार होती. तसा सामंजस्य करारही झाला होता. मात्र, फॉक्सकॉनने नंतर युनिट सुरू करण्यास नकार दिला.
फॉक्सकॉन-वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?
फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्टशी या बातमीचा संबंध आहे का?
फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर हे वृत्त व्हायरल झालंय. महत्त्वाचं म्हणजे केवळ मथळाच व्हायरल केला जात असल्यानं अनेकांचा गोंधळ उडाला आहे. मात्र, या वृत्ताच्या सध्या फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टशी काहीही संबंध नाही.
२०१५ मध्ये फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात मोबाईल पार्ट असेम्बलिंग प्लांट सुरू करणार होतं. त्यासंदर्भात तत्कालीन फडणवीस सरकारने पाठपुरावा केला होता. त्यासाठी जागा निश्चिती झाली होती आणि फॉक्सकॉन आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करारही झाला होता. फॉक्सकॉनचा हा प्रोजेक्ट अॅपल कंपनीच्या मोबाईल पार्ट्स असेम्बलिंग संदर्भात होता. मात्र, फॉक्सकॉन आणि अॅपलमध्ये अंतर्गत वाद झाल्यानं फॉक्सकॉनने माघार घेतली. याच संदर्भात सुभाष देसाईंनी ती माहिती दिली होती.
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज ठाकरेही आक्रमक
सध्या ज्या प्रोजेक्टवरून गदारोळ सुरू झालाय, तो प्रोजेक्ट पूर्णपणे वेगळा आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता समूह भारतात सेमीकंडक्टर निर्मिती करणार आहे.
ADVERTISEMENT