मराठी सिने आणि टीव्ही क्षेत्रातील कला दिग्दर्शक राजु साप्ते यांच्या आत्महत्येप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शनिवारी राजेश साप्ते यांनी पुण्यात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली होती. राजेश साप्ते यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाकड पोलिसांनी चंदन ठाकरे आणि नरेश विश्वकर्मा यांना ताब्यात घेतलंय.
ADVERTISEMENT
याप्रकरणी पोलिसांनी साप्ते यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य, चंदन ठाकरे आणि अशोक दुबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजु साप्ते यांची पत्नी सोनाली साप्तेने वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, आरोपींनी कट करुन साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याचसोबत लेबरला कामावर पाठवणार नाही ते व्यवसायिक नुकसान करु अशी धमकी देत छळ केल्याचं म्हटलं आहे.
दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी दोन पथकं तयार करुन मुंबईला पाठवली आहेत. मृत्यूपुर्वी राजु साप्ते यांनी एक व्हिडीओ तयार करत त्यात राकेश मौर्य यांचं प्रामुख्याने नाव घेतलं होतं. याव्यतिरीक्त आपल्या सुसाईड नोटमध्येही त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली होती.
काय म्हणाले होते राजु साप्ते आपल्या अखेरच्या व्हिडीओत?
आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जातोय. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीयेत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या लेबर लोकांना भडकवत आहे. यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.
माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीयेत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण राकेश मौर्या लेबर लोकांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं सांगत मला न्याय मिळावा अशी मागणी साप्ते यांनी या व्हिडीओत केली आहे.
हात-पाय तोडून गळ्यात बांधल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा – अमेय खोपकर
ADVERTISEMENT