वाल्मिक कराडला पुढील सुनावणीसाठी आज बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात बराच वेळ युक्तिवाद चालल्यानंतर वाल्मिकला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आता SIT अधिकाऱ्यांकडे वाल्मिक कराडचा ताबा असून, SIT त्याला घेऊन न्यायालयात हजर झाले होते. वाल्मिकला मोठ्या सुरक्षेमध्ये न्यायालयात आणण्यात आलं होतं. दोन्ही बाजूनं युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयात नेमकी काय सुनावणी करणार यावर सर्वांचं लक्ष होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mahesh Gaikwad Case : फरार आरोपींना पकडा, 25 हजार बक्षीस मिळवा... महेश गायकवाड यांच्याकडून बक्षीस
खडणीचा गुन्हा झाला. यानंतर तुम्ही आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात त्याचा रोल स्पष्ट करण्याबाबत कोणते पुरावे गोळा केलं होते? जे पुरावे गोळा केले आहेत... यामध्ये आरोपी थेट काही म्हणाला आहे का? तुम्ही संतोष देशमुख याच्या हत्येतील सहभाग तपसला आहे का?? असा सवाल न्यायाधीशांना तपास अधिकाऱ्यांना केला होता.फक्त एक फोन केला या बेस वर तुम्ही 302 प्रकरणात त्याला आरोपी केलं का? असाही सवाल कोर्टाने केला होता.
वाल्मिकच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
वाल्मीक विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. खंडणीच्या गुन्ह्याचा संबंध यामध्ये लावण्यात येतोय. पण मर्डर बाबत वाल्मीक याविरोधात यंत्रणा कडे कोणताही पुरावा नाही. एका गुन्ह्यातील आरोपी थेट दुसऱ्या गुन्ह्यात घेताना ठोस grounds नाहीत. मिडिया ट्रायल वर खटला कसा काय चालेल? असा सवाल केला होता.
सरकारी वकिलांनी त्याच्या मालमत्ता आणि संघटित गुन्हेगारी मार्फत मिळवलेली संपत्ती याचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. खुनाच्या गुन्ह्यात MCOCA लावण्यात आला आहे. या गुन्ह्यात आधी मोक्का लागलेल्या आरोपींचे मंजूरी पत्र कोर्टाकडून मागवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिकला 7 दिवसांची SIT कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, कोर्टाच्या परिसरात यावेळी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पुढच्या काही वेळात हे स्पष्ट होणार आहे की, वाल्मिकला किती दिवसांची कोठडी मिळेल. विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे असून, वाल्मिक कराडची बाजू वकील अशोक कवडे मांडणार आहे. वाल्मीक कराडला दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत काय काय घडलं?
वाल्मिक कराड याच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर तो काही दिवसांनी पुण्यात पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली. ज्या दिवशी कराड हा शरण आला त्याच रात्री त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. जिथे कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जी आज (14 जानेवारी) संपली. त्यानंतर याच प्रकरणी आणखी 10 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी सीआयडीच्या वतीने करण्यात आली. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आणि खंडणी प्रकरणी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली. कोर्टाचा हा निर्णय येऊन अवघे काही क्षण होत नाही तोच वाल्मिकवर SIT ने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याच्या कोठडीसाठी कोर्टाकडे अर्ज केल्याचं समोर आलं. या बातमीमुळे वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आज वाल्मिकला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
