दहीहंडीचा उत्सव आज दिवसभर साजरा करण्यात येतो आहे. दहीहंडीच्या निमित्ताने महाराष्ट्रात सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. थरांचा उत्साह, विविध गाणी, पाऊस, पाणी, दहीहंडी या सगळ्याचा उत्साह दिवसभर पाहण्यास मिळणार आहे. दहीहंडीच्या दिवशी पाऊस पडत असला तरीही गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. यावर्षी कोरोनाचं संकट नाही. त्यामुळे मागच्या दोन वर्षांप्रमाणे निर्बंध नाहीत. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा सण उत्साहात साजरा होतो आहे. या निमित्ताने ही गाणी पाहा.. आणि आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्या.
ADVERTISEMENT
दहीहंडी उत्सवात वाजवली जाणारी प्रसिद्ध गाणी
गोविंदा आला रे आला हे पहिलं गाणं आहे जे शम्मी कपूर यांच्या ब्लफ मास्टर या सिनेमात होतं. आजही ते गाणं वाजलं की उत्साह आणि चैतन्य कशाला म्हणतात त्याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. अभिनेता शम्मी कपूर या गाण्यात जे नाचला आहे त्याला खरंच जवाब नाही. आजही हे गाणं आपल्याला आनंद देऊन जातं. खु
यानंतरचं गाणं आहे ते म्हणजे खुद्दार या सिनेमातलं. अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्यावर चित्रित झालेलं मच गया शोर सारी नगरी रे हे गाणं. या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी दहीहंडी फोडली आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याशिवाय गोविंदा आजही अधुरा आहे.
या पुढचं गाणं आहे शोर मच गया शोर देखो आया माखनचोर. हे गाणं १९७४ मध्ये आलेल्या बदला या सिनेमातलं आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे. किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं आहे.
सलमान खान आणि राणी मुखर्जीचे फॅन असाल तर तुम्हाला आणखी एक गाणं आम्ही दही हंडीच्या निमित्ताने सांगणार आहोत. हे गाणं आहे हॅलो ब्रदर या सिनेमातलं. चांदी की डाल पर सोने का मोर ताक झाक ताक करे निचे का चोर… हे ते गाणं आहे. हे गाणंही दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी वाजवलं जातं. हे गाणं पाहिल्यावर तुम्हाला गोविंदांचा मॉडर्न उत्साह काय असतो तो बघायला मिळेल. गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.
या पुढचं गाणं आहे प्रभू देवाने कोरिओग्राफ केलेलं. प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. या गाण्याचे बोल आहेत गो गो गो गोविंदा… ओह माय गॉड या सिनेमातलं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या गाण्याचे बोल आणि प्रभू देवा सोनाक्षीचा डान्स लोकांना आवडतो. आजच्या दिवशी हे गाणं पाहा आणि रिफ्रेश व्हा.
ADVERTISEMENT