कोरोना महामारीच्या काळात आम्ही आमच्या उत्पन्नावर पाणी सोडलं असल्याचं मुंबईतल्या खासगी रूग्णालयांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या काळात २ हजार कोटींचं नुकसान खासगी रूग्णालयांनी सोसलं आहे.
ADVERTISEMENT
इंडिया टुडेसोबत बोलताना डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितलं आहे की कोरोना काळात खासगी रूग्णालयांनी मोठं नुकसान सोसलं आहे. डॉ. गौतम भन्साळी यांनी मुंबई महापालिकेने अपॉईंट केलेले को ऑर्डिनेटर आहेत. त्यांनी ही माहिती दिली आहे.
गौतम भन्साळी यांनी काय म्हटलं आहे?
मुंबईतल्या सुमारे ३६ खासगी रूग्णालयांनी त्यांचं नुकसान सोसलं आहे, सरकारने ४ हजार रूपये प्रति दिवस असे निश्चित केले होते. त्यामुळे कोव्हिड ट्रिटमेंट देताना मुंबईतल्या खासगी रूग्णालयांना सुमारे २ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. यामध्ये औषधोपचार, डॉक्टरांची फी असे अनेक गोष्टी होत्या. खासगी रूग्णालयांमध्ये सेवा देण्याच्या बाबतीत आणि उपचारांच्या बाबतीत तडजोड करतत नाहीत. आयसीयू रूग्णांसाठी ७ हजार रूपये आणि व्हेंटिलेटरसाठी ९ हजार रूपये शुल्क आकरण्यात येतं होतं असंही डॉ. भन्साळी यांनी म्हटलं आहे.
डॉक्टर भन्साळी पुढे म्हणाले की, सरकारी आदेशानुसार ८० टक्के बेड सरकारी नियमांतर्गत आणि २० टक्के सरकारी नियमांतर्गत ठेवण्यास सांगितले असले तरी, रुग्णालयांनी सर्व बेड सरकारी नियमांनुसार शुल्काच्या रचनेत आणल्या.
आम्ही कोरोना महामारीची कालमर्यादा जाणून न घेता आमच्या उत्पन्नावर पाणी सोडलं. आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते आणि आम्ही स्वबळावर सहमती दर्शवली त्यामुळेच मुंबई मॉडेलने खूप चांगले काम केले आणि लोकांनी या प्रसंगी मुंबईची प्रतिमा कशी चांगली राहिल हे आम्ही पाहिलं कोव्हिड प्रतिबंध उपचार केले.
ADVERTISEMENT