मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने 5 एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसंच विकेंड लॉकडाऊन देखील सुरु होणार आहे. निर्बंध लागू केल्यापासून पहिला विकेंड लॉकडाऊन हा आज (9 एप्रिल, शुक्रवार) रात्री 8 वाजेपासून सुरु होणार आहे. जो सोमवार (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असणार आहे.
ADVERTISEMENT
हा विकेंड लॉकडाऊन अत्यंत कठोर असणार आहे. यावेळी काही नियम देखील बदलण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. कोणालाही वैध कारणशिवाय सार्वजनिक स्थळी फिरता येणार नसल्याचं सरकारने आपल्या गाइडलाइनमध्ये स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सध्या लागू असलेले कठोर निर्बंध देखील लॉकडाऊन प्रमाणेच असल्याचं सर्वच स्तरातून म्हटलं जात आहे. अशावेळी विकेंड लॉकडाऊनमध्ये आणखी कोणते कठोर नियम असणार याबाबत नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी बंद असणार आहेत आणि कोणत्या गोष्टी किती वेळ सुरु असणार आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे
विकेंड लॉकडाऊनमध्ये नेमकं काय-काय आणि किती वेळ सुरु असणार?
1. फक्त वैध कारण असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी
2. वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा आणि त्याच्याशी निगडीत लोकांना विकेंड लॉकडाऊनमधून असणार सूट.
3. विकेंड लॉकडाऊनमध्ये रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, मेडिकल, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मा कंपन्या, मेडिकल आणि हेल्थ सर्विस
4. किराणा, भाजीपाल्याची दुकान, डेअरी, बेकरी, मिठाई खाद्यपदार्थांची दुकाने हे देखील सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.
5. विकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीतील ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस सुरु राहतील.
6. माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी
7. शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील
8. ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील
9. मीडियाला परवानगी असेल
10. सकाळी 7 ते रात्री 8 वाजतेपर्यंत वृत्तपत्रांच्या होम डिलिव्हरीला परवानगी
11. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा सुरु राहतील
12. विकेंड लॉकडाऊनमध्ये काय बंद राहणार
13. बांधकाम सुरु राहतील
14. कारखाने सुरु राहतील
प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर आज कोरोना लस कमी पडली नसती: उदयनराजे भोसले
विकेंड लॉकडाऊनमध्ये काय-काय बंद असेल?
1. खासगी वाहने किंवा खासगी बसेस बंद राहतील
2. सिनेमा हॉल, नाट्यगृह, अम्युझमेंट पार्क, व्हिडिओ गेम पार्लर
वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बंद राहतील.
3. विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधील पार्सल सेवा देखील बंद असेल. यावेळी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरु असणार आहे. यावेळी कोणत्याही रेस्टॉरंट, बारला आपल्याला आपली ऑर्डर घेण्यासाठी जाता येणार नाही.
4. सर्व धार्मिक स्थळं बंद, फक्त नित्य पूजा आणि प्रार्थनेला संबंधितांच्या उपस्थितीत परवानगी
5. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर बंद राहणार
6. शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद
7. सर्व राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
यापैकी अनेक गोष्टी या आठवड्यातील पाच दिवसांमध्ये देखील बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात जवळजवळ मिनी लॉकडाऊन असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT