राज ठाकरे आणि अशोक सराफ एकत्र काय करत आहेत?

मुंबई तक

• 09:21 AM • 01 Nov 2022

नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनयातले सम्राट अशोक सराफ यांचा एकत्र फोटो राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवरून पोस्ट केला.. आणि त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला की मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अशोक सराफ हे एकत्र काय करत आहेत.. ही कोणती नवीन युती? राज ठाकरे आणि अशोक सराफ यांची झाली भेट मात्र राज ठाकरेंनी आपल्या […]

Mumbaitak
follow google news

नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनयातले सम्राट अशोक सराफ यांचा एकत्र फोटो राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवरून पोस्ट केला.. आणि त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला की मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अशोक सराफ हे एकत्र काय करत आहेत.. ही कोणती नवीन युती?

हे वाचलं का?

राज ठाकरे आणि अशोक सराफ यांची झाली भेट

मात्र राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ते रविवारी अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेलं व्हॅक्युम क्लिनर हे नाटक पाहण्यासाठी विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात गेले होते. राज ठाकरे हे कलासक्त व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना नाटक,सिनेमा,संगीत याची विशेष आवड आहे..

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

काल मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आली. पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं.

निर्मिती सावंत यांचंही कौतुक

या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबतच अभिनेत्री निर्मिती सावंत यांचीही प्रमुख भूमिका आहे.. राज ठाकरेंनी त्यांच्याबद्दलही पोस्टमध्ये सविस्तर लिहीले आहे..

निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाच्या लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील. राज ठाकरेंनी हे फोटो पोस्ट केल्यानंतर अभिनयातील सम्राटाला राज ठाकरेंनी केलेल्या कौतुकाच्या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू झाला आहे.

    follow whatsapp