अजित पवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

• 08:08 AM • 26 Mar 2021

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या […]

Mumbaitak
follow google news

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय.

हे वाचलं का?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या एका मंत्र्यानेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्याने या घडामोडींना मोठं गांभीर्य प्राप्त झाल्याचं दिसलं.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, राष्ट्रपती राजवटीची जे लोक मागणी करत आहेत, त्यांना सत्ता मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच विरोधी पक्षांकडून अशी मागणी केली जातेय.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘अधिवेशनाच्या काळातही मी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधकांच्या मागणीबद्दल बोलले. सुधीर मुनगंटीवार हे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट हाच मुद्दा घेऊन बसले होते. पण मी त्यांना राष्ट्रपती राजवटीशिवाय तुमच्याकडे दुसरा मुद्दा आहे, की नाही, असं विचारलं.’

पुण्यात आता 2 एप्रिलला कठोर निर्णय घेण्याची वेळ – अजित पवारांचे लॉकडाऊनचे संकेत

Posted by Mumbai Tak on Friday, March 26, 2021

‘जनतेचे वेगवेगळे मुद्दे असतात. त्यांच्या मनात काही विचार असू शकतो. पण एकदा सांगितलं की झालं. पुन्हा पुन्हा तेच काय?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातली स्थिती काही एवढी गंभीर नाही, की ज्यासाठी राष्ट्रपती राजवट लावावी. महाविकास आघाडी सरकारकडे आज स्पष्ट बहुमत आहे. १४५ हा विधानसभेतला बहुमताचा आकडा आहे. पण सरकारकडे १६५ जणांचा पाठिंबा आहे. प्रशासनही नीट काम करतंय. सर्वकाही सुरळीत सुरू आहे.’

सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आता ATSऐवजी NIA ही राष्ट्रीय तपास संस्था करतेय. त्यामुळे आता राज्याच्या यंत्रणेवर शंका घेण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp