मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे म्हणजेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची तब्बल 6.45 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आणि इतर नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात होती. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांच्या एखाद्या नातेवाईकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गंभीर पडसाद राजकीयदृष्ट्या उमटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पुष्पक बुलियन या केसमध्ये 6.45 कोटी संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही केस मार्च 2017 साली नोटाबंदीनंतर पुष्पक बुलियन नावाच्या एका कंपनीवर केला होता आणि त्यात तपास करताना असं आढळून आलं की, नंदकिशोर चतुर्वेदी हा एक खूप मोठा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडूनच जी एंट्री प्रोव्हाइड करण्यात आली होती पुष्पक रियालिटी डेव्हलपर यांना 20 कोटी रुपयांसाठी त्याने एंट्री प्रोव्हाइड केली होती.
म्हणजेच त्याने पुष्पक रियालिटी यांना रिसीट दिली, बिलं दिली, invoice दिले. त्यासाठी 20 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्याऐवजी 20 कोटी कॅश नंदकिशोर चतुर्वेदीने यांना दिलं असावं असं तपासात समोर आलं आहे.
त्यानंतर चतुर्वेदी याने बरचशा शेल कंपनी आहेत त्यांच्याकडून लेअरिंग करुन ते पैसे दुसऱ्या जागी फिरवले. चतुर्वेदी याच्या खूप साऱ्या शेल कंपनी आहेत. त्यात एक हमसफर डिलर प्रा. लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने एक अनसिक्युरर्ड लोन 30 कोटी रुपयांचं श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड ही तीच कंपनी आहे जी श्रीधर माधव पाटणकर यांची कंपनी आहे. असं ईडीचं म्हणण आहे.
यात असं दिसून येतं की, हवाला मार्गाने हे 30 कोटी रुपये अनसिक्युरर्ड लोन दाखवून श्री साईबाब गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले गेले. त्यासाठी ईडीने काही जागांवर सर्च देखील केलं होतं. नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती काही अद्याप सापडलेली नाही अजून. हे समोर आल्यानंतर आता हे समजून येतं की, जे पैसे साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला दिले होते तोच पैसा महेश पटेल, नंदकिशोर चतुर्वेदी यांनी रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये जो निलांबरी प्रोजेक्ट आहे किंवा साईबाबा गृहनिर्मिती यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यात गुंतवले.
सगळ्यात मोठी ब्रेकींग न्यूज: रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ED कडून जप्त
हवाला मार्फत जे पैसे आले होते तेच पैसे त्यांनी गुंतवले होते. त्यात साईबाब गृहनिर्मिती कंपनीचा रोल समोर आल्याने आता 6.45 रुपये किंमतीचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत.
ईडीचं म्हणणं आहे की, महेश पटेल नावाचे एक व्यावसायिक आहेत त्यांनी जे पैसे होते पुष्पक ग्रुप कंपनी नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीतून काही पैसे उचलले ज्याला आपण सायफननॉफ म्हणतो किंवा फिरवले आणि चुकीच्या मार्गाने फिरवले. हेच पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संगनमत करुन हमसफर डिलर प्रा. लिमिटेड या कंपनीच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड यांना लोनच्या मार्फत दिले.
ईडीचं म्हणणं आहे की, साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी चालवणारे कोण आहेत, मालक कोण आहेत या कंपनीचे तर श्रीधर पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत. पण ROC मध्ये पाहिल्यावर लक्षात येतं की, पाच संचालक आहेत या कंपनीचे. त्यात श्रीधर पाटणकर यांचा उल्लेख नाही. कदाचित ते आधी डायरेक्टर असतील. पण ईडीचा दावा आहे की, ही कंपनी श्रीधर पाटणकर हेच चालवतात.
यामध्ये असं समजून येतंय की, नंदकिशोर यांच्याशिवाय चंद्रकांत पटेल किंवा पुष्पक बुलियनमध्ये ऑपरेट करणारी जी लोकं होती आणि श्रीधर पाटणकर यांचा जो रोल आहे तो चतुर्वेदी यांच्याकडून येतो.
नंदकिशोर चतुर्वेदी हा अद्यापही देखील फरार आहे. ईडीचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत पण तो अद्यापही सापडलेला नाही. काही दिवसांआधी रेड झाल्या होत्या. खरं म्हणजे चतुर्वेदी हा मोठा हवाला ऑपरेटर आहे.
ईडीने याबाबत श्रीधर पाटणकर यांना समन्स बजावले होते. पण ते काही समोर आले नव्हते. त्यानंतर जेव्हा ईडीला काही पुरावे मिळाले किंवा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीची लिंक मिळाली त्यानंतर या जप्ती करण्यात आल्या आहेत. आता पुढे श्रीधर पाटणकर यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT