मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात झालेल्या वाद झाला. नंतर त्या वादाचं रुपांतर थेट जाळपोळीत झालं. या प्रकरणामुळे काल रात्री पाळधी गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी रात्रीच या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात थेट वाल्मिक कराडचं नाव, CID ने पहिल्यांदाच...
एका नेत्याचं वाहन जात असताना ओव्हरटेक न करु दिल्यामुळे हा वाद झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी दोन्ही कारचालकांमध्ये चांगलाच वाद झाला, पण तो नंतर मिटला. मात्र, पुन्हा रात्री दोन्ही गट गावातल्या ग्रामपंचायतीसमोर आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली आणि काही वेळात या गोंधळाचं रुपांतर दंगलसदृष्य परिस्थितीत झालं. यावेळी जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आणि मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. या गोंधळात जमावाने जाळपोळही केली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही तातडीने निर्णय घेत संचारबंदी लागू केली.
हे ही वाचा >>CM Devendra Fadnavis: "दहा हजार लोकांना रोजगार..." ; वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचं मोठं विधान!
गुलाबराव पाटील यांच्या या गावात झालेल्या वादामागे आपसातील वाद आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी लोकांनी 20 ते 25 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
