क्रूझ पार्टीची टीप कुणी दिली होती? काय घडलं? सुनील पाटील यांनी दिलं उत्तर…

मुंबई तक

• 10:45 AM • 07 Nov 2021

मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझ पार्टीचं प्रकरण ‌गेल्या महिन्याभरापासून गाजतं आहे. या प्रकरणात 24 ऑक्टोबरपासून ट्विस्ट येत आहेत. कारण 24 तारखेला प्रभाकर साईल मीडियसमोर आला. तो या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. त्याने हे सांगितलं की आर्यन खानला सोडण्याच्या बदल्यात के.पी. गोसावीने 25 कोटी रूपये मागितले होते. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे होते. या आरोपामुळे एकच खळबळ […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझ पार्टीचं प्रकरण ‌गेल्या महिन्याभरापासून गाजतं आहे. या प्रकरणात 24 ऑक्टोबरपासून ट्विस्ट येत आहेत. कारण 24 तारखेला प्रभाकर साईल मीडियसमोर आला. तो या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. त्याने हे सांगितलं की आर्यन खानला सोडण्याच्या बदल्यात के.पी. गोसावीने 25 कोटी रूपये मागितले होते. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे होते. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली.

हे वाचलं का?

दरम्यान 6 ऑक्टोबरपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन हे सांगत आहेत की एनसीबीने केलेली कारवाई बनावट आहे. शनिवारी म्हणजेच 6 नोव्हेंबरला मोहित कंबोजने त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत असाही आरोप मोहित कंबोजने केला होता. आता या प्रकरणी सुनील पाटील समोर आले आहेत. त्यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहे.

सुनील पाटील तुम्ही मास्टरमाईंड आहात का? आणि क्रूझ पार्टीची टीप कुणी दिली?

सुनील पाटील-मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही, क्रूझ पार्टीची टीप मनिष भानुशालींकडे आली होती. नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत. ते कैलाश विजयवर्गीय यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी मी आणि मनिष अहमदाबादला होतो. त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं आहे. मी त्या पार्टीत सहभागी व्हायला नकार दिला. के. पी. गोसावीही तेव्हा दुसऱ्या हॉटेलवर थांबला होता.

मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. त्यांच्याशी माझं एक सेकंदही बोलणं झालेलं नाही. के.पी. गोसावी आणि मनिष हे गांधीनगरला मंत्रालयात गेले होते. ही बाब एक ऑक्टोबरची आहे. संध्याकाळी चार वाजता नकार दिला. तर ८.३० च्या दरम्यान मी मनिषला फोन केला त्याला विचारलं कुठे आहात? तर त्याने मला सांगितलं की आम्ही आयबीचे सहेब आहेत जडेजा म्हणून त्यांच्यासोबत बसलो आहोत.

किरणने मला तसाच मेसेज केला. त्यानंतर रात्री नऊ वाजता हे दोघे रूमवर आले. त्यानंतर मनिष आणि नीरज यादव यांचं बोलणं झालं. मी तेव्हाही म्हटलं की मला या कुठल्या भानगडीत पडायचं नाही. मला टीप द्यायचीही नाही आणि मला ते ऐकायचंही नाही. समीर वानखेडे तुझा मित्र आहे का? असं मला विचारण्यात आलं. मी सांगितलं मी त्यांना ओळखत नाही. माझा सीडीआर काढा. वानखेडे सरांच्या फोनमध्ये माझा एक मेसेज मिळेल काँग्रएट्स केल्याचा. मला सॅम डिसूझाने नंबर पाठवला होता आणि सांगितलं होतं की रेड केली आहे म्हणून एक मेसेज कर. त्यामुळे मी मेसेज केला असं सुनील पाटील यांनी मुंबई तकला सांगितलं.

सॅमचं नाव सॅनविल डिसूझा आहे. विजय ठाकूर आमचा कॉमन मित्र आहे त्याच्या मार्फत आमची ओळख झाली होती. मला चार महिन्यांपूर्वी सॅमने एक समन्स व्हॉट्स अॅपवर पाठवला होता. व्यवसाय प्रकरणात मला ड्रग्ज प्रकरणी समन्स आलं आहे. मला पैशांची मदत हवी आहे असंही सांगितलं आहे. मला पाच ते दहा लाख रूपये देशील का? मी म्हटलं माझी अडचण आहे मी पैसे देऊ शकत नाही आणि कुणालाही ओळखत नाही. नंतर सॅम माझ्याशी बोलला तेव्हा म्हणाला की मी एनसीबीच्या ऑफिसरला 25 लाख रूपये दिले आहेत माझं काम झालं आहे.

किरण आणि मनिषला मी सांगितलं की एनसीबीसोबत सॅमचा कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे त्यांचे नंबर दिले, मला सांगत होते की तू पण चल. मी म्हटलं मी नाही येणार, मला काम आहे.

25 कोटी मागितले होते, 18 कोटींमध्ये सेटलमेंट झाली होती याबाबत तुम्हाला काय माहिती आहे?

मला माहिती अशी आहे की अहमदाबादला हे सगळे होते. त्यानंतर २ ऑक्टोबरला किरण गोसावी, सॅम आणि मनिष सगळे एकत्रच होते. मला त्यावेळी किरण गोसावीने एक सेल्फी पाठवला आणि सांगितलं की हे बघ हा शाहरुखचा मुलगा आहे. मी अहमदाबादमध्येच होतो. त्यावेळी मला सॅमचा फोन होता की कुछ सेटिंग होईल का? मी म्हटलं तिथे किरण आणि मनिष आहेत तुम्ही बघून घ्या काय करायचं आहे. नंतर त्यांनी मला साडेआठच्या दरम्यान सांगितलं पन्नास लाख मिळत आहेत. गोसावी प्रभाकरला पाठवतोय.

प्रभाकरला लोकेशन सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं. त्यामुळे मी सॅम आणि किरण गोसावी यांचा संपर्क करून दिलं. मला रात्री उशिरा कळालं की पैसे मिळत आहेत. तिघांनीही मला सांगितलं होतं की पैसे मिळत आहेत. त्यांनी पूजा ददलानीचं नाव घेतलं होतं. नेमकं काय बोलणं झालं ते मला माहित नाही.

के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल

प्रभाकर साईल यांच्याशी काय बोलणं झालं होतं का?

प्रभाकरचा मला फोन आला होता. त्यावेळी तो म्हणाला की मी इथे थांबलो होतो, किरण गोसावींचा बॉडीगार्ड त्यानंतर मी फोन उचलला. माझा यामध्ये काहीही संबंध नाही.

तुमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक आहे असं म्हटलं जातं आहे.

हो राष्ट्रवादी काँग्रेससोबत मी 1999 पासून आहे. 2016 पर्यंत मी अॅक्टिव्ह होतो पण आता मी अॅक्टिव्ह नाही. मोहीत कंबोजने केलेले आरोप मी ऐकले. पण ऋषी देशमुखला मी ओळखत नाही. तो दिसतो कसा हे पण मला माहित नाही. मी त्यांना इतकंच सांगू इच्छितो.

आर्यन खानचं अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा मोहीत कंबोजचा खेळ एका सेल्फीने बिघडवला-नवाब मलिक

नवाब मलिक यांना तुम्ही ओळखता का?

हो नवाब मलिक यांच्याशी माझं पहिलं बोलणं १० ऑक्टोबरला झालं होतं. त्याआधी एकदाही माझं बोलणं झालं नाही. नवाब मलिक यांना मी कधीही भेटलोही नाही.माझ्यावर वेगळे आरोप कऱण्यात आले. ललित हॉटेलचं सीसीटीव्ही तपास तुम्हाला कळेल ना.. नवाब मलिक तिथे कधी आले नव्हते.

तुम्ही इतके दिवस समोर का नाही आलात?

माझ्या जिवाला धोका होता. मला दिल्लीत धवल भानुशाली, मनिष भानुशाली आणि इतर काही लोकांनी मारहाण केली. तिघा-चौघांनी मला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मला अहमदाबादवरून दिल्लीला बोलवण्यात आलं. गुजरातमध्येही मारून फेकतील. मला मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली हे दोघेही सांगत होते की कुठे जायचं नाही. माझी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे मी कसबसा जीव वाचवला आणि मुंबई गाठली.

    follow whatsapp