PM Modi Loksabha Speech Today: नवी दिल्ली: देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) पंतप्रधान मोदींनी (PM ModI) लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत तब्बल 1 तास 25 मिनिटं भाषण केलं. आपल्या या संपूर्ण भाषणात त्यांनी फक्त काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. काँग्रेसने केवळ संधीचं रुपांतर संकटातच केलं अशी जहरी टीका मोदींनी यावेळी केली. पाहा या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले. (what if prime minister modi actually spoke in the lok sabha)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेतील भाषण जसंच्या तसं:
‘काही लोकांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही’
विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. काही लोकांना ते स्वीकारता येत नाही. आज खेळाडू आपला दर्जा दाखवत आहेत. भारताच्या डंका जगभरात वाजत आहे. भारत हे उत्पादनाचे केंद्र बनले आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रात आशा दिसू लागली आहे, परंतु काही लोकांना ती दिसत नाही.’
काका हथरसी यांचा हवाला देत मोदी म्हणाले की, ‘जो जसा विचार करेल, त्याला तसंच दिसेल. काही लोक निराश झाले आहेत. ही निराशा अशीच आलेली नाही. एक तर जनतेचा आदेश, पुन्हा.. पुन्हा.. आदेश. 2014 पूर्वी अर्थव्यवस्था ही डबघाईला आली होती, महागाई दोन अंकी होती. पण आता काहीतरी चांगले घडते त्यामुळे विरोधकांमध्ये निराशा निर्माण होतेय.
‘यूपीएने प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले’
‘2004 ते 2014 हे दशक स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक घोटाळ्यांचे दशक होते. हीच 10 वर्षे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले. अनोळखी वस्तूला हात लावू नका, असं सतत बोललं जायचं. काश्मीरपासून ईशान्येपर्यंत 10 वर्षांत केवळ हिंसाचार सुरू होता.’
‘जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज इतका कमकुवत होता की जग ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे आज जेव्हा देशातील 140 कोटी जनतेची क्षमता फुलत आहे. 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी ती संधी गमावली आणि प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले.’
‘घोटाळ्यांमुळे देशाची जगात बदनामी झाली’
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘जेव्हा अणुकरारावर चर्चा होत होती तेव्हा ते नोट फॉर व्होटमध्ये गुंतले होते.’ असे ते म्हणाले. पीएम मोदींनी टूजी, कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘2004 ते 2014 या दशकात देशाचे खूप नुकसान झाले. 2030 हे दशक भारताचे आहे. दहशतवादाविरुद्ध प्रत्युत्तर देण्याचे धाडस यांच्यात नव्हते.’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
’10 वर्षे देशातील नागरिकांचे रक्त सांडले. भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या शिरपेचात आहे. टीका व्हायला हवी पण आरोपात त्यांनी नऊ वर्षे वाया घालवली. निवडणूक हरली तर ईव्हीएमला दोष द्या, भ्रष्टाचाराची चौकशी झाली तर एजन्सींना शिव्या. ईडीने या लोकांना एका व्यासपीठावर आणले. याबद्दल ईडीचे आभार मानले पाहिजेत. जे काम देशातील मतदार करू शकले नाहीत.’ असं मोदी म्हणाले.
PM मोदी लोकसभेत फक्त काँग्रेसवरच बरसले, पण अदाणींवर…
‘काही लोकांमध्ये हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे’
विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘काही लोकांना हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. हार्वर्डमध्ये अभ्यास होणार असल्याचे एका नेत्याने सांगितले होते. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे.’ असा टोमणा मोदींनी लगावला.
‘भारत कमकुवत झाला आहे की, मजबूत झाला आहे हे विरोधकांनी आधी ठरवावे. प्रथम ते म्हणतात की देश कमकुवत झाला आहे. मग ते म्हणतात की भारत इतर देशांवर दबाव आणून निर्णय घेत आहे. काही लोक आजही उद्धटपणे जगत आहेत. मोदींना शिव्या देऊनच मार्ग सापडेल, असे त्यांना वाटते.’ असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
PM Modi: ‘काल काही लोक उड्या मारत होते’, मोदींचे राहुल गांधींना टोमणे
आम्ही वंचितांना त्यांचे हक्क दिले
‘140 कोटी देशवासियांना त्यांच्या रोषाल यांना सामोरे जावे लागेल. जनतेच्या आशीर्वादाच्या संरक्षणात्मक कवचात तुम्ही खोट्या शस्त्राने कधीही प्रवेश करू शकणार नाही. तुम्ही कुटुंबासाठी जगता, मोदी 140 कोटी लोकांसाठी जगतात, काही लोक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील वंचितांना प्राधान्य देण्याचा संकल्प घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. दलित, मागास, आदिवासी ज्या अवस्थेत गेली अनेक दशके सोडले गेले, ती सुधारणा घटना निर्मात्यांनी केलेली नाही. 2014 नंतर या कुटुंबांना शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ मिळाला आहे.’
‘या कुटुंबांपर्यंत प्रथमच वीज पोहोचली असून, त्यांना नळाला पाणी मिळत आहे. ज्या वस्त्या तुम्ही निवडणुकीच्या वेळी चुकवायचो, आज तिथे रस्ते, वीज, पाणी याबरोबरच 4G कनेक्टिव्हिटीही तिथे पोहोचत आहे.’ असं भाषण पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
ADVERTISEMENT