बिग बॉस 16 ची कशी असणार रूपरेषा? चार बेडरूम, मौत का कुंवा आणि काय आहे सर्कस?

मुंबई तक

• 09:46 AM • 29 Sep 2022

दोन दिवसांनंतर प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉस सुरु होणार आहे. बिग बॉस 16 लाँच होण्याआधी, शोशी संबंधित मजेदार माहिती समोर येत आहे. बिग बॉसच्या घरात दरवर्षी क्रिएटिव्ह आणि अनोखी थीम पाहायला मिटले. हा ट्रेंड यावेळीही पाळला जाईल. बिग बॉस घरात काय घडणार आहे, याविषयी एक रंजक माहिती समोर आली आहे. ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल, […]

Mumbaitak
follow google news

दोन दिवसांनंतर प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉस सुरु होणार आहे. बिग बॉस 16 लाँच होण्याआधी, शोशी संबंधित मजेदार माहिती समोर येत आहे. बिग बॉसच्या घरात दरवर्षी क्रिएटिव्ह आणि अनोखी थीम पाहायला मिटले. हा ट्रेंड यावेळीही पाळला जाईल. बिग बॉस घरात काय घडणार आहे, याविषयी एक रंजक माहिती समोर आली आहे. ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल, असे काही घडणार आहे.

हे वाचलं का?

बिग बॉसच्या घरात 4 बेडरूम असतील

BB 16 ची थीम सर्कस असणार आहे. आधीच्या रिपोर्ट्समध्ये, सीझन 16 ची थीम Aqua असल्याचे सांगण्यात आले होते. पण तसं नाही, या शोची थीम सर्कस असेल. शोची टॅगलाइन आहे – गेम बदलेल कारण बिग बॉस स्वतः खेळणार आहे. बीबीचे घर कसे असेल हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. सर्कसच्या थीमशी मेळ साधत घराची अंतर्गत रचना ठेवण्यात आली आहे. शोच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे BB 16 मध्ये एक नाही तर 4 बेडरूम असतील.

आता बेडरूमसाठी लढत होणार आहे

आतापर्यंत कुठे बेडरूममध्ये बेडसाठी स्पर्धकांमध्ये मारामारी होत होती. तर आता कल्पना करा की या 4 बेडरूममध्ये आपली जागा बनवण्यासाठी सदस्यांमध्ये भांडण पाहायला मिळेल. मागील वेळी डबल बेड आणि सिंगल बेडवर झोपण्यावरून मारामारी झाली होती. यावेळी चार बेडरुम्स आहेत पण त्या बेडरूमचा आकार कसा असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत एकत्र बेड शेअर करणं, किती मोठा मुद्दा बनतो, हे शो आल्यावरच कळेल.

सर्वात मोठा ट्विस्ट बेडरूममध्येच पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमंग कुमार आणि वनिता कुमार यांनी या घराची रचना केली आहे. फायर रूम, ब्लॅक अँड व्हाईट रूम, कार्ड्स रूम आणि विंटेज रूम अशी चार बेडरूम्स बांधण्यात आली आहेत. प्रत्येक खोलीची थीम वेगळी असेल. या सर्व रूमशी संबंधित एक मोठा ट्विस्ट असेल, जो कोणता स्पर्धक कोणत्या खोलीत राहणार हे ठरवेल.

बिग बॉसच्या हाऊसमध्ये नवीन काय आहे?

एक विशेष जागा तयार केली गेली आहे, जिथे विहीर आहे. येथे स्टंट, शिक्षेचे टास्क किंवा लक्झरी बजेट टास्क केले जातील. स्वतंत्र कॅप्टन रूम बनवण्यात आल्या आहेत. जे अगदी राजेशाही असेल. तेथे सर्व लक्झरी सुविधा असतील. जेवणाचे क्षेत्र अतिशय सुंदर आहे. अनेक नवीन घटक जोडले गेले आहेत. लाल, गुलाबी, सोनेरी, केशरी रंगांचा अधिक वापर करण्यात आला आहे.

    follow whatsapp