गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी Modi Express गाडीची घोषणा केली. नितेश राणेंच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. दरवर्षी मुंबईतून कोकणातला चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाला जातो. या गावकऱ्यांसाठी यंदा नितेश राणेंनी खास सोय केली होती.
ADVERTISEMENT
१८०० गणेशभक्तांसह पहिली मोदी एक्सप्रेस दादर स्थानकातून आज सोडण्यात आली. ज्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून भाजप राजकीय फायदा उचलत असल्याचं बोललं जातं होतं, त्याला दानवेंनी उत्तर दिलं आहे.
“यात कोणतीही राजकीय खेळी नाही, जर शिवसेनेला असं वाटत असेल तर ती त्यांची समस्या आहे आणि ते तसा विचार करु शकतात. ही फक्त लोकसेवा आहे आणि ती का करु नये?” असं उत्तर दानवेंनी दिलं. राज्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून कोरोनाचे नियम पाळले जाणार नाहीत. या प्रकरणाला भाजप राजकीय रंग देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.
चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ निघाली कोकणात!
ट्रेनचा प्रवास हा फक्त लसींचे दोन डोस घेतलेल्यांना मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये असं भाजपचंही मत आहे. प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचं पालन करायला हवं, तिसरी लाट येऊ न देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर या माध्यमातून राजकीय फायदा होणार असेल तर त्यात अडचण काय आहे? असाही सवाल दानवेंनी विचारला आहे.
नारायण राणे आणि कोकण यांचं नातं जुनं आहे. केंद्रीय मंत्रीपदावर स्थान मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रेच्या निमीत्ताने सत्ताधारी शिवसेनेला चांगलंच फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राणेंवर अटकेची कारवाईही करण्यात आली. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतल्या मराठी आणि विशेषकरुन कोकणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप नारायण राणेंचा वापर करणार असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून सुरु झालेला हा कलगीतुरा आता कधी थांबतो हे पहावं लागणार आहे.
बेळगावात ‘कमळ’ कसं फुललं? आपल्याच बालेकिल्ल्यात एकीकरण समितीला फक्त दोन जागा, जाणून घ्या कारणं…
ADVERTISEMENT