शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना गुणरत्न सदावर्तेंमधला नथुराम गोडसे जागा झाला होता असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे. नथुराम गोडसेला नथुरामजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?
“गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्यावेळी नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता”, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकलं की घृणा वाटते आणि किळस येते. देशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे खासदार अमोल कोल्हेंकडून आत्मक्लेश
आणखी काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?
सर्व मुस्लिम बांधवांना, मराठी लिहणे, वाचणे आणि बोलणे आलंच पाहिजे, मी उर्दूच्या विरोधात नाही, पण जी मराठी ही शासकीय आणि व्यवहारातील भाषा आहे, त्यामुळे मराठी सर्वाना यायलाच हवी, अस सांगून आव्हाड पुढे म्हणाले, मुस्लीम बांधवांना मुख्य प्रवहात आणण्यासाठी उर्दू ऐवजी इंग्लिश स्कुल मध्ये शिक्षण द्यावे लागेल. मुस्लिम मुलींना पण शिक्षण द्यावे लागेल. मशीद आणि कब्रस्तान मधून बाहेर येऊन, कॉम्प्युटर आणि शाळेसाठी निधी मागा. सामाजिक मानसिकतेत बदल केला, तरच समाज बदलतो, अस परखड मत ही अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. दुसरयाला खड्यात पडणारा, स्वतः खड्यात पडला असून मशिदी बरोबर मंदिरातील पण भोंगे पण बंद झाले आहेत. उत्तरप्रदेशात जातो म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना, उत्तर प्रदेश मधूनच विरोधात झाला आहे, असा टोला ही अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
काय म्हणाले होते गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte )
“गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. नथुरामजी गोडसे यांनी हे सांगितलं होतं की महात्मा गांधी यांनी मरताना हे राम म्हटलं नव्हतं” असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे. तसंच त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT