ज्याच्यावरुन देवेंद्र फडणवीसांवर होतेय टीका तो तन्मय फडणवीस नेमका आहे तरी कोण?

मुंबई तक

• 07:03 AM • 20 Apr 2021

नागपूर: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कालपासून एका वेगळ्या गोष्टींवरुन टीका केली जात आहे. ती म्हणजे त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने घेतलेल्या कोरोना लसीवरुन (Corona Vaccine). केंद्र सरकारने सध्या फ्रंट लाइन वर्कर यांच्यासह 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांनी लस […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कालपासून एका वेगळ्या गोष्टींवरुन टीका केली जात आहे. ती म्हणजे त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने घेतलेल्या कोरोना लसीवरुन (Corona Vaccine). केंद्र सरकारने सध्या फ्रंट लाइन वर्कर यांच्यासह 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. त्यावरुनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, आता अशी माहिती समोर आली आहे की, तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर सेंटरमध्ये घेतलेला कोरोनाचा दुसरा डोस होता. त्यामुळे आता विरोधक या सगळ्यावरुन फडणवीसांनाच घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्या तन्मय फडणवीस याच्यामुळे विरोध पक्ष नेते अडचणीत येत आहेत तो तन्मय फडणवीस नेमका आहे तरी कोण यावर टाकूयात एक नजर

तन्मय फडणवीस यांच्याविषयी थोडक्यात माहिती. (Who is Tanmay Fadnavis)

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा चुलत पुतण्या आहे तन्मय फडणवीस. माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा तो नातू आहे. जी माहिती मिळते आहे त्याप्रमाणे तन्मय हा एक इंजिनिअर असून तो काही दिवस मुंबई तर काही दिवस नागपुरात वास्तव्यास असतो. त्याला ग्लॅमरची बरीच आवड असल्याचं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन पाहायला मिळत आहे.

तन्मयला लस कशी काय मिळाली?, ‘या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांच्या भावाची प्रतिक्रिया

तन्मय फडणवीस याचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील ‘मूल’ हे आहे. तन्मयच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर त्यावर त्याने पब्लिक फिगर असा उल्लेख केला आहे. तर आपल्या ट्विटर अकाउंटवर त्याने अॅक्टर असं नमूद केलं आहे. मात्र, तो ट्विटरवर फारसा अॅक्टिव्ह नसल्याचं यावेळी पाहायला मिळतं. पण इंस्टाग्रामवर तो फारच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, तन्मय हा खूपच स्टायलिश आहे. ब्रँडेड वस्तू वापरणाऱ्या तन्मयने आतापर्यंत अनेकदा फोटो शूट देखील केलं आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे काही फोटो देखील त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तन्मय हा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सामाजिक कार्यात सक्रीय असल्याचंही दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नागपूर पोलीस आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पीपीई किटचं वाटप देखील केलं होतं.

पुतण्या तन्मयने लस घेतल्याने काका देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

दरम्यान, तन्मयने नागपूरमध्ये जो कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला तो त्याला कोणत्या आधारावर मिळाला याचा तपास होणे गरजेचे असल्याचं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

नेमकं काय घडलं?

तन्मय फडणवीस यांचा लसीकरण करतानाचा फोटो हा त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नेटकऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने ट्विटर, फेसबुकवर चांगलेच ट्रोल केले. माजी मुख्यमंत्री यांच्या पुतण्याला जर सगळे नियम शिथील आहेत. मग नागपूर कॅन्सर इन्सस्टि्युटने 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करावे अशी मागणी होऊ लागली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर तन्मय फडणवीस यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय फडणवीस यांचं वय हे अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या देशात 45 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येते आहे. अशात तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली हा प्रश्न विचारला जातो आहे.

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असलेले शैलेश जोगळेकर हे संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे तर ही लस तन्मय फडणवीस यांना सहज मिळाली का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, या सगळ्या वादानंतर तन्मयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हे फोटो डिलीट केले आहेत.

काँग्रेसने काय प्रश्न विचारले आहेत?

तन्मयने लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकताच देवेंद्र फडणवीस ट्रोल होऊ लागले. काँग्रेस पक्षाने त्यावर सोशल मीडियातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का?

  • फ्रंटलाईन वर्कर आहे का?

  • आरोग्य कर्मचारी आहे का?

  • जर नसेल तर त्याला लस कशी काय दिली गेली?

  • भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचाही गुप्त साठा आहे का?

असे सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आले आहेत.

    follow whatsapp