Adani Group : OCCRP Report मुळे चर्चेत आलेले विनोद अदाणी कोण आहेत?

भागवत हिरेकर

03 Sep 2023 (अपडेटेड: 03 Sep 2023, 09:39 AM)

occrp report allegations on adani group : अदाणी समूहावर ओसीसीआरपी रिपोर्टमध्ये गंभीर आरोप केले गेले आहेत. यात विनोद अदाणींचा उल्लेख जास्त आहे. ते कोण आहेत, काय करतात आणि कुठे राहतात?

Reports about his group have been published in foreign media. Gautam Adani's elder brother Vinod is at the center of both these allegations.

Reports about his group have been published in foreign media. Gautam Adani's elder brother Vinod is at the center of both these allegations.

follow google news

who is vinod adani : गौतम अदानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अदाणी समूहाबद्दल एक रिपोर्ट प्रसिद्ध झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या रिपोर्टने हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांप्रमाणेच आरोप केले आहेत. अदाणी समूहाने गुपचूप शेअर्स खरेदी केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. शेअर बाजारावर देखरेख करणारी संस्था सेबीच्या नियमांनुसार कंपनीचे प्रवर्तक 75% पेक्षा जास्त शेअर्स ठेवू शकत नाहीत. उर्वरित 25% लोकांकडे असावेत. अदाणी समूहावर तीन कंपन्यांचे 12-14% सार्वजनिक शेअर्स गुपचूप खरेदी केल्याचा आरोप आहे. यामुळे बाजारातील शेअर्सच्या किंमती वाढण्यास मदत होईल अशी शक्यता आहे. कारण लोकांकडे कमी शेअर्स असतात.

हे वाचलं का?

दुसरा आरोप आहे की अदाणी पॉवरने दुबईतील एका कंपनीला प्लांट उभारण्यासाठी खरेदी केलेल्या मशिनरीचे जास्तीचे बिल दिले. नंतर हा पैसा शेअर बाजारात गुंतवल्याचा आरोप आहे. या दोन्ही आरोपांच्या केंद्रस्थानी गौतम अदाणी यांचे मोठे भाऊ विनोद अदाणी आहेत. त्यामुळे विनोद अदाणी कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

तुम्हाला माहित नसेल की विनोद अदाणी यांचे नाव हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये 151 वेळा आले होते, तर गौतम अदाणी यांचे नाव 54 वेळा आले आहे.

विनोद अदाणी गौतम अदाणींचे कोण? (How is Vinod Adani related to Gautam Adani?)

गौतम अदाणी यांना पाच भाऊ आहेत. आर.एन. भास्कर यांच्या पुस्तकातील माहितीनुसार, गौतम अदाणी आणि राजेश अदाणी समूहाचे दैनंदिन काम पाहतात, तर विनोद अदाणी हे दुबईतून अदाणी समूहाचा वित्तपुरवठा पाहतात.

हेही वाचा >> Gautam Adani Net Worth : OCCRP मुळे अदाणींना धक्का! श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

विनोद अदाणी यांचे वय 74 वर्षे आहे. ते सायप्रसचे नागरिक आहेत. दुबई आणि सिंगापूरमध्ये राहतात. हारुणच्या रिपोर्टमध्ये 2022 मध्ये त्यांची संपत्ती 1 लाख 69 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.

विनोद अदाणींनी बदलले आडनाव

विनोद अदाणी यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 1976 मध्ये त्यांनी मुंबईजवळ कापड गिरण्या सुरू केल्या होत्या. 1989 मध्ये ते सिंगापूरला गेले आणि त्यानंतर 1994 पासून दुबईत राहू लागले. 2016 मध्ये त्यांचे नाव पनामा पेपर्स लीकमध्ये आले होते. ही कंपनी बहामासमध्ये 1994 मध्ये उघडण्यात आली होती. कंपनी उघडल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी आपले नाव विनोद शांतीलाल अदाणी असे न ठेवता बदलून विनोद शांतीलाल शाह केले.

आता समजून घेऊयात ताज्या अहवालाबद्दल. यात विनोद अदाणी, संयुक्त अरब अमिरातीचे नासेर अली शाबान अहली आणि तैवानचा चांग चुंग लिंग अशा तीन लोकांच्या नावाचा उल्लेख आहे. नसीर आणि चांग हे अदाणी समूहाशी संबंधित कंपन्यांशी संबंधित आहेत. डीआरआयच्या तपासातही त्यांचे नाव पुढे आले होते. चांग चुंग यांनी सिंगापूरमध्ये दिलेला पत्ताही विनोद अदाणी यांचाच आहे.

Adani Group : मॉरिशस फंडातून गुंतवणूक, गुपचूप शेअर्स खरेदी, अदाणी प्रकरण घ्या समजून

2017 मध्ये अदाणी ग्रुपच्या तीन कंपन्यांमधील नासिर अली आणि चांग चुंग यांचे शेअर्स सुमारे 13 ते 14 टक्के होते. अदाणी समूहाचे शेअर्स खरेदी करणाऱ्या मॉरिशस फंडांना सल्ला देण्याचे काम विनोद अदाणी यांच्याशी संबंधित कंपनी करत होती. या बदल्यात या कंपनीने फिसही घेतली.

नियमानुसार प्रवर्तकाने 75% पेक्षा जास्त शेअर्स ठेवू नयेत. कागदावर, अदाणी समूहाकडे या तीन कंपन्यांमध्ये 75% पेक्षा कमी शेअर्स आहेत. नासिर आणि चँग यांनी अदाणींच्या वतीने शेअर्स ठेवल्याचे सिद्ध झाले तर कायद्याचे उल्लंघन होईल.

या तीन कंपन्या

अदाणी एंटरप्राइजेस
अदाणी पॉवर
अदाणी ट्रान्समिशन

दुसऱ्या रिपोर्टमध्ये विनोद अदाणी आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत. अदाणी यांनी त्यांच्या वीज कंपनीसाठी दुबईतील एका कंपनीमार्फत वस्तू खरेदी केल्या. मालाचे बिल जास्त दाखवले. हाच पैसा दुबईच्या कंपनीतून वळवून शेअर बाजारात गुंतवला. दुबईची कंपनी विनोद अदाणी यांच्याशीही जोडलेली आहे.

कंपनी आपले शेअर्स गुपचूप खरेदी करू शकत नाही. डीआरआयने 2014 पूर्वी तपास सुरू केला होता, नंतर त्याला क्लीन चिट मिळाली.

या आरोपांवर विनोद अदाणी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. हिंडेनबर्ग अहवालातील आरोपचं नव्याने पुढे आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे आणि आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे अदाणी समूहाने म्हटले आहे. अदाणी समूहाने हिंडेनबर्गच्या अहवालानंतर म्हटले होते की, विनोद अदाणी समूहात कोणत्याही पदावर नाहीत. ते रोजच्या कामात सहभागी नसतात. नंतर विनोद अदाणी प्रमोटर ग्रुपचा एक भाग असल्याचे निवेदन दिले गेले होते.

हेही वाचा >> …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला सोबत घेत नाहीये

एप्रिलमध्ये विनोद अदाणी यांनी ऑस्ट्रेलियातील कोळसा संबंधित कंपन्यांचा राजीनामा दिला होता. अदाणी समूह या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गौतम अदाणी हे वर्षाच्या सुरुवातीला जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यानंतर हिंडेनबर्गचा अहवाल आला. शेअर बाजाराच्या किंमतीत घसरण झाली होती. नवीन अहवाल आला, तेव्हा अदाणी समूह आपला व्यवसाय निश्चित करण्यात व्यस्त होता. गौतम अदाणी आता श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 21व्या क्रमांकावर आहेत.

    follow whatsapp